
.
कुडाळ प्रतिनिधी( इम्तीयाज मुजावर) म्हसवे जिल्हा परिषद गटात रस्त्यांसह पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधींची मंजुरी; दुर्गम वाडी-वस्त्यांपर्यंत पोहोचणार विकासाचा हात
जावळी तालुका – “गाव तिथे रस्ता, वस्ती तिथे वाट” ही संकल्पना कृतीत उतरवणारे जावळीचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुंबरे (भाऊ) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जावळी तालुक्यात तब्बल ₹90 कोटींचा विकास निधी मंजूर झाला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून आलेल्या या निधीमुळे म्हसवे जिल्हा परिषद गटासह दुर्गम डोंगराळ भागातील प्रत्येक वाडी-वस्त्यापर्यंत विकासाची वाट मोकळी होणार आहे.

वसंतराव मानकुंमरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्री शिवेंद्रसिंहराजेंकडे नियमित पाठपुरावा केल्यानंतर म्हसवे गटातील विविध रस्ते आणि पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. “विकासात कोणताही भाग वंचित राहू नये, हा माझा आणि शिवेंद्रसिंहराजेंचा निर्धार आहे” असे मानकुंमरे भाऊ यांनी स्पष्ट केले. लवकरच या सर्व कामांचे भूमिपूजन नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे.
मंजूर झालेली प्रमुख कामे –
महू ते खोकाड माळ रस्ता – ₹40 लाख
आखेगणी ते बनवाडी – ₹40 लाख
करंदी/सुर्वेवाडी रस्ता – ₹30 लाख
पानस फाटा ते बापु गोळे यांच्या घरापर्यंत – ₹1 कोटी
हातेघर ते पानस – ₹75 लाख
बेलोशी ते रांजनी – ₹1.5 कोटी
कुडाळ आखाडे फाटा ते करहर – ₹80 कोटी (काँक्रीटीकरण)
आखाडे फाटा ते दरे – ₹5 कोटी

या निधीमुळे जावळी तालुक्यातील दळणवळणाच्या सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारतील. शेती, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण पर्यटनालाही चालना मिळणार असून, नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
—