
जावळी तालुक्यात ‘बाबाराजे चषक 2025’ क्रिकेट स्पर्धेला भव्य सुरुवात; शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली तालुकास्तरावरील ऐतिहासिक आयोजन
कुडाळ, ता. जावळी:
जावळी तालुक्यात प्रथमच तालुकास्तरावर इतक्या मोठ्या प्रमाणात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, ‘बाबाराजे चषक 2025’ ही भव्य स्पर्धा दिनांक १८, १९ व २० एप्रिल २०२५ रोजी पाटील मळा, कुडाळ येथे खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, मा. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले (मा. मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, पालकमंत्री – लातूर जिल्हा) यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रेरणेत ही स्पर्धा एका नव्या उंचीवर नेण्यात आली आहे.
दर्जेदार पारितोषिके – स्पर्धेची शान
- प्रथम पारितोषिक: ₹५०,०००/- (सौजन्य – मा. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले)
- द्वितीय पारितोषिक: ₹२५,०००/- (सौजन्य – मा. जयदीप शिंदे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती)
- तृतीय पारितोषिक: ₹१५,०००/- (सौजन्य – श्री. समीर आतार व श्री. राहुन्न ननावरे)
- चतुर्थ पारितोषिक: ₹१०,०००/- (सौजन्य – श्री. मच्छिंद्र मुळीक गुरुजी)
विशेष वैयक्तिक बक्षिसे
- मालिकावीर: शिराळकर वडापाव सेंटर, कुडाळ
- उत्कृष्ट फलंदाज: जयदीप शिंदे, कुडाळ
- उत्कृष्ट गोलंदाज: साहिल शेवते, डी.सी. पंशन, कुडाळ
सहकार्य आणि सौजन्य – सामूहिक सहभागातून यशाकडे वाटचाल
या स्पर्धेच्या यशामागे जावळी तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे सहकार्य लाभले आहे. मैदान सौजन्य रणजीत कदम, बॉल सौजन्य संदीप आबा पवार, यूट्यूब कव्हरेज वसीम शेख व इम्तियाज मुजावर, तसेच पाणी पुरवठा मयंक अॅक्वा यांनी दिला आहे.
ओंकार शिंदे, वैभव शेठ पवार, दीपक शेवते, आपुलकी पेट्रोलियम, किशोर वारागडे, विष्णू शिंदे, तोडकर फॉर्म आणि मातोश्री कृषी सेवा केंद्र यांनी विशेष सहकार्य केले आहे.
आयोजकांचा पुढाकार – क्रिकेटच्या माध्यमातून गावकुसाबाहेरचा प्रभाव
या स्पर्धेचे आयोजन ABC क्रिकेट क्लब, कुडाळ अर्थात ‘कुडाळ 11’ यांनी केले असून, स्थानिक पातळीवरील क्रिकेटला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली आहे.
या माध्यमातून नवोदित क्रिकेटपटूंना आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार असून, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा जावळी तालुक्यातील एक नवा मैलाचा दगड ठरणार आहे.
बाबाराजे चषक 2025 ही केवळ क्रिकेट स्पर्धा नसून, जावळीच्या ग्रामीण भागातील तरुणांमध्ये उत्साह, संघभावना आणि आत्मविश्वास निर्माण करणारा उत्सव ठरणार आहे.
– प्रतिनिधी, जावळी जुबेर शेख