जावळी तालुका मध्ये प्रशासन नागरिकांच्या दारी — प्रश्नांना मिळतोय दिलासादायक आधार

कुडाळ *(इम्तियाज मुजावर) जावळी महसूल विभागाची तळागाळात धडक — नागरिकांच्या प्रश्नांना जागेवरच दिलासाराज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानांतर्गत जावळी तालुका येथे महसूल सेवांचा लाभ थेट ग्रामस्तरावर पोहोचवण्याचा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या प्रलंबित महसुली कामांचा निपटारा, नोंदी दुरुस्ती आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा, या उद्देशाने चावडी वाचनासह समाधान शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.


मामुर्डी व भिवडी या गावांमध्ये आयोजित शिबिरांमध्ये ७/१२ उताऱ्यातील दुरुस्ती, वारस नोंदी, एकूण शेरा व इतर हक्कातील नोंदी कमी करणे, अ.पा.क. प्रकरणे, तसेच लक्ष्मी मुक्ती आणि संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची नोंदणी व मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरांमुळे नागरिकांना कार्यालयीन फेऱ्यांपासून मोठा दिलासा मिळाला असून अनेक प्रकरणांचा जागेवर निपटारा करण्यात आला.


या उपक्रमाचे मार्गदर्शन

उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल,
तहसीलदार प्रवीण मुदगल, शेख रावसाहेब आणि जयश्री मोहिते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. महसूल विभागाच्या समन्वयातून ग्रामपातळीवर सेवा सुलभ होत असून ‘Ease of Doing Business’ अनुषंगाने नागरिकाभिमुख प्रशासनाचा आदर्श उभा राहत आहे.


शिबिरांमुळे महसूल सेवांबाबत जनजागृती वाढत असून तक्रारींचे त्वरित निवारण, अभिलेख दुरुस्ती आणि योजनांचा थेट लाभ देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रवीण बुडगळ यांनी केले आहे.
तळागाळापर्यंत पोहोचलेल्या या उपक्रमामुळे जावळी महसूल विभागाच्या कार्याची महती सर्वदूर पोहोचत असून नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!