
मेढा (प्रतिनिधी) जावळी तालुक्यातील मेढा येथे सार्वजनिक ठिकाणी दोन युवक धूम्रपान करताना अर्थातच सिगारेट ओढताना मेढा पोलिसांना आढळले आणि मेढा पोलिसांनी या दोन्हीही युवकांवर तंबाखू नियंत्रण कायदा 2003 चे कलम 4,.. 21 प्रमाणे कारवाई केली आहे
. कारवाई झालेल्या युवकाचे नाव शैलेंद्र कन्हैयालाल प्रजापति वय 25 राहणार मेढा तर यश संतोष जवळ वय 19 राहणार मेढा असे आहे
जावळी तालुक्या सदर दोन्हीही युवक सार्वजनिक ठिकाणी सिगारेट पीत असताना पोलिसांना आढळले
जावळी तालुक्यात बऱ्याच दिवसांनी सार्वजनिक ठिकाणी खुलेआम सिगरेटचे धुरांडे काढताना पहिल्यांदाच अशी कारवाई करण्यात आली असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे
मात्र यामुळे सार्वजनिक ठिकाणी जी तरुणाई खुलेआम सिगरेट घेऊन धुरांडी काढत असते आणि फॅशन मारत असते अशा युवकांना मेढा पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे
यामुळे आता मेढ्यासह जावळी तालुक्यात पानपट्टीवर अथवा सार्वजनिक ठिकाणी कोणीही तोंडात सिगरेट घालायला सुद्धा आता हिम्मत करणार नाही हे सिद्ध झाले आहे
या कारवाईमुळे आता चांगलाच धसका सिगरेट पिणाऱ्या युवकांनी घेतला आहे
तालुक्यातल्या युवा पिढी सावधान ,जर खुलेआम सिगरेट पिताना पोलिसांना आढळला तर मेढा पोलीस नक्की कारवाई करणार
जावळी तालुक्यातल्या पोलीस ठाण्याला नवीन पोलीस अधिकारी लाभले आहेत. नव्याने पदभार घेणारे api पृथ्वीराज ताटे यांनी जावळी तालुक्यात आता आगळीवेगळी मोहीम उभारली आहे
भरकटलेल्या तरुणाईला वटणीवर आणण्यासाठी खुलेआम जर कोणी सिगारेट पीत असेल दारू पिऊन धिंगाणा घालत असेल ,सडक सख्या हरीप्रमाणे कॉलेजच्या कट्ट्यावर चौकात जर कोणी फिरत असेल, तर त्याला बसणार आता चाप
त्यामुळे मेढा पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस अधिकारी पृथ्वीराज ताटे यांच्या कारवाई पासून जर वाचायचे असेल तर खुलेआम सिगरेट पिणे बंद करा, असा सल्ला पोलीस कर्मचाऱ्यांकडून दिला जात आहे. याबाबत मेढा पोलीस ठाण्यात या दोन्ही युवकांच्या विरोधात विरोधात खुलेआम सिग्रेट पिणे व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणे अशा बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे करत आहेत