
कुडाळ | प्रतिनिधी वसीम शेख
जावळी तालुक्याचे राजकारण पुन्हा एकदा समीकरणांच्या भोवऱ्यात अडकले आहे. माथाडी कामगार नेते दत्तात्रेय पवार उर्फ भालेघरे यांच्या समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या निषेध मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी सांगितले त्यामुळे जावळी तालुक्यात राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून थेट जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे त्यामुळे अचानक निषेध मोर्चाला परवानगी देता येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे

🔹 आरोप-प्रत्यारोपांची पार्श्वभूमी
अधिवेशनादरम्यान सत्ताधारी भाजपचे आमदार तसेच विरोधी काँग्रेसचे आमदार यांनी दत्तात्रेय पवार यांच्यावर “अनधिकृत बेहिशोबी मालमत्ता गोळा केली” असा आरोप करत त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हे आरोप खोटे व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा करण्यात आला. त्याविरोधात तालुक्याचे बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे वसंतराव मानकुंमरे यांनी ४ ऑगस्ट रोजी निषेध मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते. व जावळी तालुक्याच्या या सुपुत्रासाठी व समर्थनासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते त्याची बॅनरबाजी आणि पोस्टरबाजी देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती आणि त्याच दिवशी शशिकांत शिंदे यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा सत्कार हा त्याच दिवशी मेढा येथे होणार आहे या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात प्रतिस्पर्धी विरोधी असणारे मानकुंमरे आणि शशिकांत शिंदे गट या कार्यक्रमासाठी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते असे वातावरण सध्या तयार झाले होते

🔹 पोलिसांची परवानगी नकार – राजकीय डावपेच?
या मोर्चाला जावळी पोलिसांनी परवानगी नाकारताच तालुक्यात नवे राजकीय तर्क वितर्क सुरू झाले आहेत. मानकुंमरे यांची जावळीतली ताकद लक्षात घेता त्यांचा मोर्चा रोखणे हे राजकीय दबावाचे परिणाम असल्याची चर्चा जोर धरते आहे. जावळी तालुक्यात सध्या वसंतरावांची राजकीय मोठी ताकद आहे आणि दिमतीला राजकीय मोठी फौज फाटा त्यांच्या बरोबर आहे वसंतराव हे स्वतः भाजपमध्ये तालुक्यातील वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याबरोबर तालुक्यातील सर्व भाजपची मोठी लॉबी आहे अशा पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यात या मोर्चाला परवानगी नाकारणे हा आता माणकुमरे भाऊ साठी प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झालेला आहे परवानगी नाकारली अशातच
जावळी तालुक्यातील शरद पवार गटाची तालुक्यात वाढती ताकद अधोरेखित होत असल्याचे शरद पवार गटाकडून व कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे त्यामुळे या परवानगी नाकारल्यामुळे आता चार ऑगस्टला होणारा शशिकांत शिंदे यांचा भव्य सत्कार आणखीन ताकतीचा करण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांचे समर्थक यांनी कंबर कसली आहे
🔹 शशिकांत शिंदे यांच्या सत्कारामुळे वाढलेले राजकीय तापमान वाढले
दुसरीकडे, याच दिवशी (४ ऑगस्ट रोजी) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा सत्कार जल्लोषात होणार असल्याचे निश्चित झाले आहे. एका बाजूला निषेध मोर्चा रोखला जात असताना दुसऱ्या बाजूला सत्कार सोहळा मोठ्या थाटामाटात होणार असल्याने “राजकीय वजन कुठल्या बाजूला झुकतेय?” असा प्रश्न कार्यकर्त्यांतून विचारला जात आहे.
🔹 तालुक्याचे समीकरण कोणाकडे?
जावळीत मानकुंमरे यांची संघटनशक्ती प्रचंड आहे. तर शिंदे गटाला प्रदेशाध्यक्षपदामुळे नवी ऊर्जा लाभली आहे. त्यामुळे “मानकुंमरे भाऊ परवानगी नाकारली असली तरी प्रशासनाच्या व या सत्कार समारंभाच्या विरोधात नाकावर टिचून मोर्चा काढतात का?” की वसंतरावांच्या आणखीन काही राजकीय खेळांमुळे वेगळे राजकीय ट्विस्ट निर्माण होते की पोलिसांच्या बंदोबस्तामुळे मोर्चा थांबतो, हेच आता तालुक्यातील राजकीय भविष्यकाळाचे दिशानिर्देश ठरणार आहे.
🔹 जिल्हाभराचे लक्ष जावळीकडे
एकीकडे शरद पवार गटाची ताकद वाढून आ शिंदे गटाची पकड अजून घट्ट होते? या प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसांत मिळतील. मात्र सध्या तरी सातारा जिल्ह्याचे राजकारण जावळीच्या रणांगणाकडे डोळे लावून बसले आहे.