
नामदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंच्या हस्ते कुडाळ येथे उद्घाटन
जावळी तालुक्यातील कुडाळ जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाचा शुभारंभ उद्या रविवार, दिनांक 6 जुलै रोजी सकाळी 9 वाजता संपन्न होणार आहे. या नव्या कार्यालयाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जावळीच्या जनतेचे लोकनेते नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या माहितीची घोषणा भाजप जावळी तालुकाध्यक्ष संदीप परांमने यांनी केली आहे. कुडाळ येथील समर्थ फर्निचर शेजारी साकारलेले हे कार्यालय जावळी तालुक्याचा पहिला भव्यदिव्य पक्ष संपर्क केंद्र म्हणून ओळखले जाणार आहे.
🔸 भाजपची ताकद वाढणार – कार्यकर्त्यांना मिळणार थेट संपर्क!
या कार्यालयामुळे केवळ कुडाळ आणि म्हसवे जिल्हा परिषद गटांमध्येच नव्हे, तर संपूर्ण तालुक्यात भाजप पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक दृढ होणार आहे. मतदार आणि कार्यकर्त्यांना थेट शिवेंद्रसिंहराजेंशी संवाद साधण्यासाठी हे कार्यालय प्रभावी दुवा ठरणार आहे.
तालुकाध्यक्ष संदीप परांमने यांनी सांगितले की, जावळीच्या मुलुख मैदानी तोफ वसंतराव मानकूमरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, हे कार्यालय जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि भाजपचा विचार दूरदूर पोहोचवण्यासाठी प्रभावी मंच ठरणार आहे.
🧡 कार्यकर्त्यांनो, चला एकत्र या – जावळीला देऊ एक नवा गतीमान दिशा!
या भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी जावळी तालुक्यातील सर्व भाजप प्रेमी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप जावळी तालुक्याच्यावतीने करण्यात आले आहे.
–