
🚨 सातारा ब्रेकिंग न्यूज 🚨
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात सावळी (सावरी) गावात मुंबई क्राईम ब्रँचचा मोठा छापा टाकण्यात आला आहे.
एका शेडमध्ये एमडी ड्रग्स तयार होत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
या कारवाईत तीन कारागीरांसह एक स्थानिक व्यक्ती, असे एकूण चार जण पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहेत.
याआधी मुंबई व पुण्यातील कारवाईनंतर संशयित आरोपींनी सावळी गावात एमडी ड्रग्ज निर्मिती सुरू केल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतरच ही धडक कारवाई करण्यात आली.
➡️ पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा.



