
साताऱ्यात ‘संग्राम दादा’ रोकडे यांची धडाकेबाज एंट्री – पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती, नेतृत्वाला मिळाला नवा वेग
कुडाळ | प्रतिनिधी वसीम शेख
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A गट) पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडीच्या अध्यक्षपदी सोनगाव, ता. जावळीचे सुपुत्र संग्राम अशोक रोकडे यांची आज साताऱ्यात मोठ्या जल्लोषात नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील वाहतूक आघाडीला नवसंजीवनी मिळणार असून, सातारा जिल्ह्यातील आर.पी.आय. (A) गटाची ताकद आणखीन भक्कम होणार आहे.
सातारा जिल्हा कार्यालयात राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ, तालुका अध्यक्ष विजय ओव्हाळ, विनोद उर्फ बाबा ओव्हाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही नियुक्ती झाली. सातारा जावळी जावळी तालुक्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

मुंबईच्या छेडानगर (चेंबूर) येथील केंद्रीय कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे, बाळासाहेब पवार, अशोक ससाणे, मिसळे नितीन जाधव, आकाश घोडके, इंगळे तसेच मुंबईतील पदाधिकारी उपस्थित असताना रोकडे यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी अजय चव्हाण, शोएब पठाण, ओंकार सावंत, गणेश निपाणे, दीपक जाधव, सतीश रोकडे, प्रतीक रोकडे, साहिल रोकडे, अविनाश जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते म्हणून संग्राम रोकडे यांची ओळख आहे. फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेवर चालत त्यांनी युवकांमध्ये जागृती घडवून आणली. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार आणि राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या निर्णयानुसार त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करताना “संग्राम दादा पुढे चला, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत” अशी घोषणा दिली. लवकरच वाहतूक आघाडीच्या वतीने सातारा जिल्ह्यात भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दादासाहेब ओव्हाळ यांनी दिली.
रोकडे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील वाहतूक आघाडीची संघटनात्मक ताकद वाढून युवकांमध्ये नवा उत्साह निर्माण होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
–