जावळीचं स्वप्न पूर्ण होणारच — कुसुंबी गटातील जनतेनं अर्चना रांजणेंवर टाकला विश्वासाचा कौल(व्हिडीओ)

(इम्तियाज मुजावर)–/-जावळी तालुक्याच्या स्वप्नपूर्तीसाठी अर्चना रांजणे ठरल्या जनतेची एकमेव पसंती
जावळी तालुक्यातील कुसुंबी जिल्हा परिषद गटात यंदाची निवडणूक केवळ राजकीय लढत न राहता विकास विरुद्ध संधी वाया घालवण्याची अशी निर्णायक लढाई ठरत आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवार तथा माजी जिल्हा परिषद सदस्या अर्चना ज्ञानदेव रांजणे या पुन्हा एकदा संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरल्या असून, त्यांच्या विजयासाठी कुसुंबी गट अक्षरशः एकवटलेला दिसत आहे.


जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून, घराघरात जाऊन प्रचार, वाडी-वस्ती, दुर्गम डोंगराळ भाग, गल्लीबोळ ते मुख्य बाजारपेठांपर्यंत “मी अर्चना रांजणे” या भावनेने प्रचार सुरू आहे. हा प्रचार केवळ मत मागण्यापुरता मर्यादित नसून, गेल्या कार्यकाळातील विकासकामांचा लेखाजोखा मांडणारा आणि पुढील पाच वर्षांचे स्वप्न दाखवणारा आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून जावळी तालुक्यात झालेला सर्वांगीण विकास आज जनतेसमोर ठळकपणे उभा आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण पायाभूत सुविधा यामध्ये झालेला बदल जनतेने प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. याच विकासाच्या प्रवाहात कुसुंबी जिल्हा परिषद गट आणखी सक्षमपणे पुढे न्यावा, यासाठी अर्चना रांजणे यांची निवड अपरिहार्य असल्याची भावना मतदारांमध्ये दृढ होत आहे.


केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असताना, त्या सत्तेच्या बळावर कुसुंबी गटाला अधिक निधी, अधिक योजना आणि अधिक गती देणे शक्य आहे. हाच विचार घेऊन महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर अर्चना रांजणे यांच्या विजयासाठी कामाला लागले आहेत. “विजय तर हवाच, पण तो विक्रमी मतांनी” हीच प्रत्येकाची भूमिका बनली आहे.
यापूर्वीच्या कार्यकाळात अर्चना रांजणे यांनी प्रत्येक नागरिकाला केंद्रबिंदू मानून विकास पोहोचवला. कुठलाही भेदभाव न करता, शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवण्याचा त्यांचा दृष्टिकोन आज त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या जनसमुदायातून स्पष्ट दिसतो. त्यामुळेच गावागावात, वाडी-वस्तीवर “जावळीचं स्वप्न पूर्ण करणारी अर्चना रांजणेच” असा नारा उमटू लागला आहे.


जावळी तालुक्याचा कायापालट करणाऱ्या शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्याच मार्गदर्शनात अर्चना रांजणे यांना मिळणारा प्रचंड जनसमर्थन हा केवळ राजकीय पाठिंबा नसून, तो जावळी तालुक्याच्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा आवाज ठरत आहे. त्यामुळे कुसुंबी जिल्हा परिषद गटात अर्चना रांजणे यांचा विजय हा आता केवळ शक्यता न राहता, जनतेचा ठाम निर्णय बनत चालला आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!