जावळी:खळबळजनक बातमी : कोलेवाडी ग्रामपंचायत ग्रामसेवकाच्या पार्टीत शिपायाचा मृत्यू!

खळबळजनक बातमी : कोलेवाडी ग्रामपंचायतीच्या पार्टीत शिपायाचा मृत्यू!

तापोळ्यातील रिसॉर्टमध्ये ग्रामपंचायत ग्रामसेवकाच्या बदली ‘सेलिब्रेशन’चा अखेर मृत्यूने घेतला विटंबन…

जावळी तालुक्यातील कोलेवाडी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची पार्टी एकाच्या मृत्यूने काळवंडली आहे. ग्रामसेवकाची बदली झाल्याच्या निमित्ताने सरपंच, ग्रामसेवक, सदस्य आणि शिपाई असे ग्रामपंचायतीतील असे 4 जण पार्टीसाठी तापोळ्याला गेले होते. मात्र, या पार्टीदरम्यान ग्रामपंचायतीचा शिपाई याने अति मद्यप्राशन केले असल्याची माहिती समोर येत आहे आणि तो थेट १० फूट उंच कठड्यावरून खाली पडला.

या अपघातात शिपायाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच मृत्युमुखी पडला. हसतखेळत सुरू झालेलं हे ‘सेलिब्रेशन’ काही तासांतच शोकांतिका ठरलं.

या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू म्हणून झाली असून, पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हा प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण कोलेवाडी परिसरात खळबळ उडाली असून, ग्रामपंचायतीच्या जबाबदार पदांवर असणाऱ्यांनी असा प्रकार घडल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सार्वजनिक पदावरील व्यक्तींनी असा गैरवर्तन करणे अत्यंत निंदनीय असल्याचं ग्रामस्थांचे म्हणणं आहे.

ही घटना फक्त एक अपघात नाही, तर ग्रामपंचायतीच्या शिस्तशून्यतेचे आणि जबाबदारीच्या अभावाचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!