‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये शौर्य गाजवणाऱ्या सायगावच्या सुपुत्राचा गौरव

जावली तालुका | सायगाव गावचा सुपुत्र मा. अमोल सुभाष देशमुख यांनी भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी होऊन अत्यंत मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्या या शौर्यपूर्ण योगदानाची दखल घेत सायगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शौर्य पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

या गौरव समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.ना. श्रीमंत छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी उपस्थित राहून पुरस्काराचे वितरण केले. त्यांच्या हस्ते अमोल देशमुख यांना गौरवण्यात आले. यावेळी प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांची देखील विशेष उपस्थिती होती.

गावात उत्साही वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात अनेक मान्यवर, ग्रामस्थ व तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अमोल देशमुख यांच्या शौर्याची गावकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्तुती केली.