
*जावली जोडी रन * देशातील पहिली जोडी रन ही जावली मध्ये होते ह्याचा आहे अभिमान . आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शुभ हस्ते आज जावली जोडी रनचे पोस्टर प्रसारित करण्यात आले . त्यावेळी जावली जोडी रनचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ डिगे, सुहास पाटील सचिव संजय धनावडे प्रियांक शेलार डॉक्टर सुधीर पवार डॉक्टर अविनाश वरांडे राहुल शिंदे मिलिंद हळवे संग्राम पाटील सागर निंबाळकर सुप्रिया मोरे विलास डिगे संतोष कदम अविनाश कारंजकर, आणि उपस्थित होते . आपली जावली जोडी रन २०२4वर्ष 5वे . जावली सारख्या दुर्गम डोंगराळ भागात भारतातील पहिली जोडी रन सारखी स्पर्धा होते आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे . त्यामुळे या दुर्गम भागातील तरुण तरुणींना क्रिडा विषयक एक नाविन्यपूर्ण व्यासपीठ उपलब्ध होत आहे .

गेली चार वर्षे या जोडी रन मध्ये स्थानिकांचा वाढता सहभाग आहे . त्यामुळे ‘ आपली जावळी जोडी रन ‘ लोकप्रिय होत आहे . यामध्ये सातारा सांगली,कोल्हापूर,पुणे, फलटण, वाई,बारामती, इथून स्पर्धक येत आहेत असे उद्गार जावळीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले . त्याच बरोबर जावळी तालुक्याचे तहसिलदार श्री कोळेकर साहेब यांनी ही भारतातील प्रथम जावळी जोडी रन साठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन कार्यकर्त्यांना दिले .

मेढा मेढा मधील सर्व कॉलेज शाळांना मुलांनी ह्यामध्ये भाग घ्यावा मेढा, कुडाळ, केरघळ, सायगाव,व्यवसायिकांनी ह्यामध्ये धावण्यासाठी यावे अशी आव्हान उद्योजक ज्ञानदेव रांजणे साहेब यांनी केले आहे येथील यांनी ही आपली जावळी जोडी रन साठी सहकार्य करणार असल्याचे अश्वासन दिले .जोडी रन साठी सहकार्य टॉप गिअर सातारा अजिंक्य उद्योग , यशवंत हॉस्पिटल मीनाक्षी हॉस्पिटल,गजानन सुझुकी,
जोडी मॅरेथॉनचे संस्थापक नवनाथ डिगे यांनी सांगितले की जोडी राणी 6 ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता मॅरेथॉनला सुरुवात होईल मॉड पूल मार्गे कुसुंबी पुन्हा रिटर्न मेढा अशी दहा किलोमीटरची रन होईल व चार किलोमीटरचा फन रन होईल यांनी जास्तीत जास्त जावलीकर व सातारकरांनी रजिस्ट्रेशन करावे असे आव्हान केले व जावळी करांनी सहकार्य करावे अशी विनंती केली