जावलीत देव पाण्यात… आरक्षणाच्या प्रतीक्षेत ‘नेतृत्वाची लढाई’!


🔴(इम्तियाज मुजावर स्पेशल पॉलिटिकल रिपोर्ट…. )देव पाण्यात… आरक्षणाच्या प्रतीक्षेत ‘नेतृत्वाची लढाई’!

जावळीतील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय रणभूमी सज्ज | इच्छुकांच्या रांगा, आरक्षणावर साऱ्यांचे लक्ष


सातारा (प्रतिनिधी)
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका सध्या राजकीय तापमान उकळायला सुरुवात झाली आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका जवळ आल्याची चाहूल लागताच, गावागावांत ‘नेतृत्वासाठी’ मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. इच्छुकांचे देव पाण्यात गेले असून, नव्या आरक्षण सोडतीच्या प्रतीक्षेत सगळ्यांचे डोळे लागून राहिले आहेत.


कमळ हर गल्लीत, पण गटात गटबाजी!

जावळीमध्ये भाजपचे बांधकाम मंत्री आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा एकतर्फी प्रभाव जाणवतोय. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘कमळ’ गावागावांत फुललेलं असलं, तरीही त्यांच्याच गटात उमेदवारीसाठी काट्याची टक्कर आणि अंतर्गत रस्सीखेच सुरू झाली आहे.

माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुंमरे, प्रतापगड साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, माजी सभापती सुहास गिरी, बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे – हे सगळेच नेतृत्वासाठी सज्ज. पण शिवेंद्रसिंहराजेंच्या ‘मर्जीतील’ उमेदवार कोण? यावर सगळ्यांची नजर आहे. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भलेही सर्व तीन जिल्हा परिषद गटातील हे दिग्गज नेते तुझ्या गळ्या माझ्या गळ्या गुंफू मोत्यांच्या माळा असे वातावरण असले तरी एकमेकांच्या भेटीनंतर हाम आपके है कोन असे म्हणतात. आणि वर्चस्वासाठी अंतर्गत कार्यकर्त्यांमध्ये आ देखे जरा किसमे कितना है दम! निवडणुकीत याला इंगा दाखवूया !वातावरण भलेही व्यासपीठावर एकत्रित असले तरी जावळी तालुक्यात शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या तिन्ही जिल्हा परिषद गटात काही अलबेल नाही .एकमेकांच्या उगाधोग्या काढण्यात सर्वच नेते मग्न आहेत. कोण किती पाण्यात हे देखील नेते आपापल्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा करतात. आणि जिरवा जिरवीचा राजकारणामध्ये व्यस्त असतात. यामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जवळ कोण आणि त्यांच्या मर्जी जिंकण्यासाठी एकमेकांना कुरघोड्याचे राजकारण व चुगलखोरीचे राजकारण सध्या जावळी तालुक्यामध्ये सुरू झाले आहे. त्यामुळे या राजकारणाचा फटका येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये बसणार असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. मात्र यातच प्रत्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना जर अशा पद्धतीच्या राजकारणाची माहिती असेल तर वेळेतच परस्परांमधील असणारे मनामनातील मनभेद दूर करावे लागणार आहेत . आणि कान ही टोचावी लागतील. चेहऱ्यावर हसू मनात ठिसु !जरा काही मनाविरुद्ध झालं तर रुसू बाई रुसू कोपऱ्यात बसू या वातावरणाला बदलण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना प्रत्यक्ष प्रत्येकाचे कान टोचणे गरजेचे आहे .नाहीतर याचा फायदा महाविकास आघाडीतल्या नेत्यांना नक्कीच होईल हे मात्र नक्की! सगळेच जावळी तालुक्यातील महायुतीचे नेते भलेही व्यासपीठावर एकमेकांना टाळी देत असले तरी वेळ पडली तर पाटीत धोपाटे टाकायला देखील कमी पडणार नाहीत .अशी जणू काही परिस्थिती अंतर्गत मनभेदातून झाली आहे त्यामुळे अशा मनभेदाच्या राजकारण चव्हाट्यावर आलं नसलं तरी देखील दबक्या आवाजातून अंतर्गत कलहाचे वातावरण तालुक्यात पहावयास मिळत आहे .हा कलह आता प्रत्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी माहिती घेतल्यानंतर त्यांना जेव्हा हे सर्व प्रकार कळतील तेव्हाच सगळं वातावरण होईल असे बोलले जात आहे.


महायुतीमध्ये नेते कमी, मतभेद जास्त!

शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या दोन घटक पक्षांत नेतृत्वाचा अभाव स्पष्टपणे दिसतोय. कार्यकर्ते सैरभैर आहेत. दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गट जावळीमध्ये जवळपास निष्प्रभ असल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार सदाभाऊ सपकाळ आणि माजी सदस्य अमित कदम यांची हलकीशी हालचाल सुरू असली, तरी ती पुरेशी ठरत नाहीये.


‘आरक्षण की राजकारण’ – देव पाण्यात, डाव मात्र उभा!

२०२२ मध्ये झालेली आरक्षण सोडत रद्द झाल्यानंतर, नव्या आरक्षणाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. जावळीतील कुडाळ, मेढा, म्हसवे – या तिन्ही जिल्हा परिषद गटांमध्ये नेते आधीच आपली वाघीर अंथरून ठेवतायत.
आरक्षण कसं पडेल, हे ठरत नाही तोपर्यंत ‘देव पाण्यात’ टाकले जात आहेत, आणि डाव मात्र लावले जात आहेत.


शिवेंद्रसिंहराजेंचा डाव Vs विरोधकांची संधी

या निवडणुकीत ‘अंतर्गत अस्वस्थता’ आणि ‘स्पर्धा’ ही भाजपच्या यशाला आव्हान ठरू शकते.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना साथ देणारे नेतेच एकमेकांशी स्पर्धेत आहेत. हीच परिस्थिती विरोधकांसाठी संधीचं दार उघडू शकते.
शरद पवार राष्ट्रवादी, अजित पवार गट, शिवसेना (शिंदे आणि ठाकरे) – सर्व गटांनी स्वतंत्र तयारी सुरू केली आहे. आरक्षणानुसार जागा मिळाल्यास त्यांचा ‘शिकार मोड’ सुरूच राहील.


सावध भूमिका, आडूनच खेळी

बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे यांची भूमिका सध्या ‘सावध’ आहे. ते वसंतराव मानकुंमरे यांना “चिटकले” असले, तरी ‘बोलतात वेगळं, करतात वेगळं’ हा मानकुंमरे यांचा लौकिक त्यांना सतावतोय.


‘किंग’ की ‘किंगमेकर’ – अंतिम निर्णय आरक्षण ठरवणार!

वसंतराव मानकुंमरे यांना ‘ओपन’ आरक्षण मिळाल्यास ते स्वतः रिंगणात असणारच. पण इतर आरक्षण पडल्यास तेच ‘तोच उमेदवार’ ठरवणार, हे सर्वांना ठाऊक आहे.


अंतिम निष्कर्ष – ‘अंतर्गत अस्वस्थता + आरक्षण’ = राजकीय गणितांचं भाकीत बदलणार?

या निवडणुकीत ‘नेतृत्वासाठी धडपड’, ‘उमेदवारीसाठी झुंबड’, आणि ‘आरक्षणावर अवलंबून टायमिंगची खेळी’ अशी तिहेरी रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.
एकीकडे शिवेंद्रसिंहराजेंचं वजन, तर दुसरीकडे त्यांच्या गटातील अंतर्गत स्पर्धा – यातून नक्की कोण किंग आणि कोण किंगमेकर ठरेल, हे येणाऱ्या आरक्षणाच्या निकालावर ठरणार आहे!

शरद पवार गटाचे कुडाळ जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य दीपक पवार एका नव्या इनिंग मध्ये जावळी तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती गटात दिसून येणार आहेत त्यामुळे काहीही झालं तरी कुडाळ जिल्हा परिषद गटामध्ये आज देखील दीपक पवार यांचा वर चष्मा आहे सलग तीन वर्ष जिल्हा परिषद गटावर पैलवानी स्टाईल मध्ये धोबीपछाड करत दीपक पवार यांनी प्रस्थापितांना कायमस्वरूपी आसमान दाखवला आहे त्यामुळे यावेळी देखील दीपक पवार कुडाळ जिल्हा परिषद गटासह संपूर्ण जावळी तालुक्यात शरद पवार गटाचा झेंडा फडकवण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर उतरतील मात्र त्यांना शरद पवार गटाचे किती साथ मिळेल शशिकांत शिंदे त्यांना किती साथ देतील हे पाहणे आता औत्सुक्याचे आहे



aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!