जमिअत उलमा ए हिंदने दिला मानवतेचा संदेश – प्रा डॉ यशवंतराव पाटणे

पुसेसावळी वार्ताहर -मानवता हे संरकृतीचे श्रेष्ठ मूल्य आहे. मानवतेचा संदेश देण्यासाठी जमीअत उलमा ए हिंद संस्थेने वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करून संस्कृती जपली आहे.वक्तृत्व शब्दांचा खेळ नसून तो विचारांचा उत्सव असतो. वक्तृत्वाच्या साधनेनून गुणवत्ता प्राप्त होतेः परीक्षेतील गुणांची गोकबेरीज म्हणजे गुणवत्ता नसते, कर्बलाच्या लढाईत इमाम हुसेन यांनी दिलेले बलिदान समस्त मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे या घटनेने परस्पर प्रेमाचा, सत्याचा, न्यायाचा आणि धैर्याचा संदेश दिला आहे असे वक्तव्य प्रा डॉ यशवंतराव पाटने यांनी शाहूकला मंदिर सातारा येथील जमीअत उलमाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.

मोहरमचे औचित्य साधत जमीआत उलमा ए हिंद हया संस्थामार्फत सातारा जिल्ह्यातील भुईंज कुडाळ, वाई ,वाठार स्टेशन, शिरवळ,कोरेगाव , रहिमतपूर,कराड,लोणंद पुसेसावळी,आणि सातारा हया ठिकाणी ७२ योद्ध्याच्या स्मरणार्थ ७२० जन्नांनी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला यश मिळवित तब्बल ७५५ जणांनी रक्तदान केले ज्यामध्ये स्त्रियांचा सहभाग मोठा होता तसेच सर्वधर्मीयांनी सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माणुसकी हाच धर्म मानत मानवतेचा संदेश दिला.

यावेळी बोलताना पाटणे सर म्हणाले जमिअत उलमा ए हिंदने मोहरम निमित्त सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात माणुसकी जपण्यासाठी कर्बलच्या हुसेन यांच्या सह 72 वीरगती प्राप्त योद्ध्यांच्या स्मरणार्थ सर्वधर्र्मियांना बरोबर घेत 720 लोकांचे रक्तदान केले तसेच मोहरम निमित्त कर्बलाचा खरा इतिहास लोकांसमोर येण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेत मानवतेचा संदेश दिला आहे.

यावेळी बोलताना मौलाना अब्दुल रऊफ नदवी म्हणाले की गीता , रामायण आणि कुराण ह्यांच्या माध्यमातून माणुसकीचं शिकविली जात आहे आणि आज जमीअत उलमा ए हिंद तेच कार्य पुढे घेवून जात आहे .

इमाम हुसेन यांचे कार्य फक्त मुस्लिम धर्मियांसाठी नव्हते तसेच बलिदान सुद्धा फक्त मुस्लिमांसाठी नव्हते तर सकल मानव जाती साठी होते व त्यांची खरी शिकवण नागरिकांच्यात जावी यासाठी वक्तृत्व स्पर्धा घेतली होती व त्याच्यावर सोनेरी झालर लावण्यासाठी प्रा डॉ यशवंतराच पाटणे सर आणि मौलाना अब्दुल रौफ साहब नदवी यांचे व्याखायन आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी, भुईंज, कुडाळ, वाठार, शिरवळ, लोणंद, वाई, कोरेगाव, रहमतपूर, कराड आणि सातारा पुसेसावली येथील अनेक मित्रांनी रात्रंदिवस अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुजित शेख यांनी केले आभार मुफ्ती ओबेदुल्लाह यांनी मानले

कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी, भुईंज, कुडाळ, वाठार, शिरवळ, लोणंद, वाई, कोरेगाव, रहमतपूर, कराड आणि सातारा पुसेसावली येथील अनेक मित्रांनी रात्रंदिवस अथक परिश्रम घेतले. विशेषतः मुबीनभाई महाडवाले, मोहसिनभाई बागवान, अज़हरभाई मणेर, सादिकभाई शेख, आरिफभाई खान, अब्दुल हमीदभैय्या शेख (कराड), हाजी नदाफ, मोहसिनभाई कोरबु, साकीब बागवान, मुजफ्फर सय्यद, वसीम शेख पिरवाडी, सलमान शेख, ॲड. अम्जद साहेब खान, मोहसिनभाई कुडाळ, आरिफभाई भुईंज, परवेज काझी शिरवळ, सलीम शेख लोणंद, सैफ शेख रहमतपूर, वारीसभाई कोरेगाव, शेरखानभाई वाई, हमीदखान पठाण वाठार,शाहरुख बागवान, सर्फराज बागवान पुसेसावळी सादिक अली बागवान,रझिया शेख , शकील सय्यद जकातवाडी ,आणि शाळेतील शिक्षक – जुनैद सर, साद सर, तरन्नुम मॅडम, तसेच आमचे उलेमा व हाफिजांमधून मौलाना रियाज, मुफ्ती अ. अज़ीम, मुफ्ती मोहसिन, मौलाना ज़मीर, मौलाना अ. अलीम, मौलाना इम्रान साहेब (वाई), हाफिज मोहसिन साहेब आणि जिल्ह्यातील इतर अनेक उलेमा व हाफिज यांनी खूप मेहनत घेऊन काम केले.

:- आज धर्म जातं प्रांत आणि पक्ष सोडून सर्व मानवाला मानवाशी जोडणारे जे आहे ते आहे रक्त. रक्त गरजवंताला त्याच्या गरजेनुसार धर्म जात पंथ सोडून मानवतेच्या नात्याने दिले जाते म्हणून रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन करून आपण मानवतेचा संदेश दिला आहे. जमीआत स्वातंत्र्य पुर्व काळापासून देशात मानवता , धार्मिक स्वातंत्र्य आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी संघटना आहे आणि हया संघटनेचा माणुसकी आणि मानवता आणि भाईचारा प्रस्थापित केल्याशिवाय देश महासत्ता बनणार नाही हा विश्वास असल्यामुळेच माणुसकी वाढवून भाईचारा वृधिंगत करण्यासाठी हया कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
सादिकभाई शेख सातारा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!