ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे चोरीचा प्रयत्न फसला
बुधवार 22/11/2023 रोजी वाठार पोलीस स्टेशन हद्दीतील सोनके ता. कोरेगाव, जिल्हा_ सातारा गावात रात्री 12:30 वाजता गावात श्री अर्जुन साठे यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने 3-4 चोर आलेले आहेत,याची माहिती मिळताच, गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष रंगराव धुमाळ यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता,तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे (18002703600)सर्व गावाला ही माहिती कळवली. त्यामुळे तात्काळ गावकरी घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण गाव सतर्क झाल्याचे लक्षात येताच चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व पुढील अनर्थ टळला.