
भालेघरे प्रकरणाचा उद्रेक – वसंतराव मानकुमरे यांच्या नेतृत्वाखाली उठणार मेघगर्जना
कुडाळ प्रतिनिधी इम्तियाज मुजावर | ३१ जुलै २०२५
जावळी तालुक्याचा अस्मितेचा आवाज उफाळून आला आहे! कोलेवाडी गावचा सुपुत्र, कष्टकरी कुटुंबातून यशस्वी उद्योजक बनलेले दत्तात्रय भालेघरे (दत्ता भालेघरे) यांच्यावर झालेल्या खोट्या आरोपांमुळे संपूर्ण तालुका पेटला आहे. याच्या निषेधार्थ पाचवड-कुडाळ-दरे-केळघर-मेढा मार्गे भव्य मोर्चा व एसटी स्टँड समोर जाहीर सभा आयोजीत करण्यात येत आहे.
“दिसेल तेथे गोळ्या घाला” – हे शब्द विधानसभेत वापरणाऱ्या आमदाराविरुद्ध संतापाची लाट
नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात, एका सत्ताधारी आमदाराने दत्ता भालेघरे यांच्यावर “तो गुंड आहे”, “गोळ्या घाला” असे वक्य उच्चारून लोकशाहीच्या सभागृहाचेच अपमान केला. विशेष म्हणजे, त्या आमदाराला दत्ता भालेघरे कोण आहेत, हेही ठाऊक नाही, तरी केवळ काही स्वार्थी नेत्यांच्या सांगण्यावरून एसआयटी चौकशीची मागणी करत त्यांना नामशेष करण्याचा कट रचण्यात आला.
भालेघरे यांच्यावर मलीद्याची मागणी – नकार दिल्यावर द्वेषाचे राजकारण सुरू!
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही तथाकथित कामगार नेत्यांनी दरमहा “मलीद्याची” मागणी भालेघरे यांच्याकडे केली होती. मात्र “मी कष्टातून मोठा झालो आहे, मलीद्यासाठी नव्हे!” असे भालेघरे यांनी ठाम सांगितल्यावर, त्यांच्यावर खोटे आरोप व राजकीय हल्ले सुरू झाले.
➡️ संप घडवणे, ब्लॅकमेलिंग, युनियनच्या नावावर सौदे – हा “कामगार नेत्याचा” गोरखधंदा फोडून काढल्यामुळेच, भालेघरे आज राजकीय द्वेषाचे बळी ठरत आहेत.

मुलुख मैदानी तोफ उतरतोय मैदानात – मानकुमरे यांच्या नेतृत्वाखाली जनशक्तीची गर्जना!
माथाडी संघटनेचे खंदे नेते श्री. वसंतराव मानकुमरे (भाऊ) हे या संपूर्ण लढ्याचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या परखड शैली, जनभावनेशी थेट जोड, आणि अन्यायाविरोधात आक्रमक भूमिका यामुळे मोर्चास प्रचंड प्रतिसाद मिळणार आहे.
“ज्यांना कामगारांचा नेता म्हणायचं, त्यांनी कामगारांना पिळून स्वतःचा संसार भरला. आता जेव्हा कुणीत मेहनतीतून वर येतो, तेव्हा त्याच्या पायात साखळ्या घालण्याचा प्रयत्न केला जातो. हे चालणार नाही!”
– वसंतराव मानकुमरे (भाऊ)
🛑 मोर्चा माहिती:
📅 सोमवार, ४ ऑगस्ट २०२५
🕙 सकाळी १० वाजता – पाचवडपासून सुरुवात
मार्ग: कुडाळ – दरे – केळघर – मेढा
🕑 दुपारी २:०० – मेढा एसटी डेपो समोर जाहीर सभा

“भालेघरे म्हणजे गुन्हेगार नव्हे, कष्टातून घडलेला जावळीचा ब्रँड!”
दत्ताभाऊंनी स्वतःच्या उद्योगातून शेकडो लोकांना रोजगार दिला. आज त्यांच्या विरोधात उभे राहणारे तेच लोक, जे त्यांच्या घरात मलीदा मागायला येत होते, हे चित्र संपूर्ण जावळीची डोळे उघडणारे ठरत आहे.
ही लढाई व्यक्तीपुरती नाही – हा लढा स्वाभिमानाचा आहे!
“गुन्हेगारांना झाकलं आणि उद्योजकाला झाकायचं? हे कोणत्या संस्कृतीत बसतं?”
🟥 जावळीच्या मातीतून उठलेल्या जनशक्तीचा, अब्रू राखणाऱ्या सुपुत्रासाठीचा, हा उठाव केवळ सुरुवात आहे…!