
फोटो( गावकरी ग्रामस्थांशी चर्चा करताना भाजप जावळी तालुका माजी अध्यक्ष श्रीहरी गोळे )
गाव/वस्ती चलो अभियानात रांजणी येथे भाजपा कार्यकर्त्यांची प्रभावी भेट; समस्यांवर तत्काळ उपाययोजना
करहर प्रतिनिधी– गाव/वस्ती चलो अभियानाच्या अंतर्गत मौजे रांजणी (ता. जावळी) येथे आज प्रभावी दौरा पार पडला. या भेटीमध्ये बूथ प्रमुख श्री. सुनील सपकाळ, सचिव श्री. सहदेव रांजणे, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. भीमराव रांजणे गुरुजी, श्री. रामचंद्र रांजणे गुरुजी, श्री. शाम रांजणे गुरुजी तसेच अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्योग आघाडीचे श्री. दीपक गावडे शेठ व अन्य कार्यकर्ते यावेळी सोबत होते.
भेटीदरम्यान ग्रामस्थांच्या विविध समस्या जाणून घेण्यात आल्या. पिण्याच्या व वापराच्या पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेऊन कृष्णा खोरे महू धरणाच्या लिफ्ट स्कीमसाठी तातडीने संबंधित अभियांत्यांशी संपर्क साधून कार्यवाहीस गती देण्यात आली. तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम लवकर सुरू व्हावे यासाठीही अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्यात आला व ग्रामस्थांना कामाच्या प्रगतीची माहिती देण्यात आली.
यासोबतच, सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय बाबाराजे यांच्यासोबत ग्रामस्थांची विशेष बैठक आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले. बूथ समितीची नवीन रचना अद्यावत करण्यात आली असून, पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला.
या बैठकीत जावळी तालुक्याचे भाजपचे माजी अध्यक्ष श्री. हरी गोळे यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी चर्चा झाली व पुढील कार्ययोजनांसाठी दिशादर्शन करण्यात आले.