“गावासाठी झटणारा प्रशांत शिंदे, तरुणाईचा हिरो!”

“कुठलंही पद नाही, पण प्रत्येक मनात स्थान आहे – हा नेता वेगळाच आहे!”

गावासाठी झटणाऱ्या युवा नेता प्रशांत शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आजचा दिवस आखाडे गावासाठी विशेष आहे. कारण गावाचा लाडका, प्रामाणिक, झटणारा आणि लोकहितासाठी नेहमी तयार असलेला युवा नेता प्रशांत बापूसाहेब शिंदे यांचा आज वाढदिवस! गावात “प्रशांत” हे नाव उच्चारलं की, डोळ्यांसमोर उभा राहतो तो सडपातळ, देखणा, साउथच्या हिरोला टक्कर देणारा, पण तितकाच तापट, थेट, आणि दिलदार स्वभावाचा तरुण! राजकारणातील प्रस्थापित नेत्यांना कायमस्वरूपी धक्का तंत्र देण्याची स्टाईल प्रशांतची फेमस आहे प्रस्थापित नेते केवळ राजकारण करतात आणि गावाचा वापर करतात मात्र प्रशांत शिंदे यांनी ही व्याख्या बदलून टाकली आणि गावातल्या प्रस्थापित नेत्यांना जोरका झटका दिरेसे दिला ही स्टाईल प्रशांतची फेमस आहे

विकास हीच ओळख – लहानपणापासून मोठं स्वप्न

प्रशांत शिंदे यांचा जन्म एका कुटुंबात झाला जिथे समाजसेवा ही केवळ परंपरा नाही, तर ती श्वासासारखी आत्म्यात भिनलेली आहे. आई सौ. हेमलता शिंदे या गावाच्या उपसरपंच, तर वडील बापूसाहेब शिंदे हे सोसायटीचे संचालक – दोघंही गावासाठी, समाजासाठी झटणारे. आणि हाच वारसा अत्यंत तडफदार पद्धतीने पुढे चालवतोय प्रशांत शिंदे!

स्मशानभूमीचा डांबरी रस्ता – 76 वर्षांचं स्वप्न साकार

देश स्वतंत्र झाल्यापासून गावकऱ्यांची एक मागणी कायम होती – स्मशानभूमीचा रस्ता डांबरी व्हावा. हा रस्ता प्रशांत शिंदे यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्षात आला. फक्त बोलून नाही, तर रात्रंदिवस पाठपुरावा करत, यंत्रणा हलवत गावाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं जाणारं काम प्रशांत यांनी पूर्ण केलं!

पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःची जमीन दिली!

उन्हाळ्यात गावात पाण्याची टंचाई हा कायमचा प्रश्न. मात्र हा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी शिंदे कुटुंबानं एक मोठा निर्णय घेतला – स्वतःची मालकीची जमीन गावाला विहिरीसाठी देणं.
त्या जमिनीवर उभी राहिलेली मोठी विहीर आज अनेक घरांना जीवनदायिनी ठरत आहे. हेच असतं खऱ्या अर्थानं दातृत्व आणि नेतृत्वाचं प्रतीक!

बैलगाडा शर्यतीचा वारसा जपणारा खरा शेतकऱ्यांचा मुलगा

प्रशांत शिंदे यांना बैलगाडा शर्यतीचा पारंपरिक नाद! घरात तीन पिढ्यांपासून चालत आलेली ही परंपरा त्यांनी अभिमानाने पुढे चालवली. त्यांचे बैल सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध, आणि ही ओळख आहे एका अस्सल ग्रामीण मुलाची – जो मातीशी जोडलेला आहे, आणि माणसांशीही!

कुठलंच पद नाही, तरी लोकांच्या मनात घर

गावातील कोणतंही पद न भूषवता प्रशांत शिंदे यांनी प्रत्येक कामामध्ये पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायतीची इमारत असो, तलाठी कार्यालयासाठी जागा असो, की युवकांसाठी नेहमीसाठी उभं राहणं – प्रशांत नेहमीच पहिल्या रांगेत दिसतो.

मैत्रीचा राजा – तरुणांचा हिरो

प्रशांत शिंदे यांचा स्वभाव म्हणजे सौम्यता आणि सामर्थ्याचा संगम. कुठल्याही तरुणाशी सामंजस्याने बोलणं, नव्या संकल्पनांना साथ देणं आणि वेळ आली तर दोन हात करण्याची तयारी ठेवणं – हेच त्यांना गावातील प्रत्येक युवकाच्या गळ्यातला ताईत बनवतं!

शुभेच्छांचा वर्षाव – कारण ‘तो’ आहे लोकांचा नेता

आज वाढदिवसाच्या निमित्ताने अख्खा गाव, शेकडो मित्र, हजारो शुभेच्छुक त्यांच्या कार्याची दखल घेत आहे. प्रशांत शिंदे नावाचं वादळ आता फक्त गावापुरतं मर्यादित नाही, ते युवा नेतृत्वाचं उगमस्थान बनतंय!


प्रशांत शिंदे यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
तुमच्या कार्यातून गावाचा विकास, शेतकऱ्यांचा सन्मान, आणि युवकांना दिशा मिळत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

इम्तियाज मुजावर 9765566861

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!