गणेश विसर्जन अनुषंगाने सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीमधील ६१ जणाविरुध्द प्रतिबंधक मनाई आदेश

-: गणेश विसर्जन अनुषंगाने सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीमधील ६१ जणाविरुध्द प्रतिबंधक मनाई आदेश :-

दिनांक १९/०९/२०२३ ते दिनांक २८/०९/२०२३ रोजी पर्यंत गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मा. समीर शेख सो, पोलीस अधिक्षक, सातारा, मा. बापू बांगर सो, अपर पोलीस अधिक्षक, सातारा व मा. किरणकुमार सुर्यवंशी सो, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा शहर याचे मार्गदर्शनाखाली दिनांक २८/०९/२०२३ रोजी गणेश विसर्जन असल्याने गणेश विर्सजनादरम्यान सार्वजनिक शांतता भंग, शांततेला व सुव्यवस्थेला बाधा पोहचण्याचा संभव आहे. सातारा तालुक्यात सार्वजनिक ठिकाणी मिरवणुकीमध्ये वावर करु नये, परिसरात थांबू नयेत, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेकामी सातारा शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील ६१ सराईत गुन्हेगारावर सीआरपीसी कलम १४४ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई होणेकरीता महेंद्र जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सातारा शहर पोली ठाणे यांनी प्रस्ताव सादर केले होते. त्याप्रमाणे मा. उपविभागीय दंडाधिकारी, सातारा उपविभाग, सातारा यांनी प्राधिकृत केलेल्या अधिका-याचे आदेशान्वये सातारा शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील ६१ सराईत गुन्हेगाराना दिनांक २७/०९/२०२३ चे ००.०० ते दिनांक २९/०९/२०२३ चे सकाळी १०.०० वाजेपर्यंत सातारा तालुक्यात हद्दीत थांबणेस मनाई आदेश जारी केला आहे. सदर कालावधीत नमुद सराईत गुन्हेगार सातारा तालुका हद्दीत मिळुन आल्यास त्याचेवर प्रचलित कायदयान्वये कारवाई करण्यात येणार आहे.

नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नागरीकांना गणेश उत्सवादरम्यान प्रशासनाकडुन देण्यात येणा-या मार्गदर्शनक सुचनांचे पालन करावे. त्याचे उल्लंघन यास त्याचेवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!