
सातारा, दि. ८ : रोबोटिक सर्जरी मधील पुण्यातील निष्णात डॉ. सौरभ गिरी हे येत्या गुरूवारी, ११ सप्टेंबर रोजी सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे नवीन रुग्णांची गुडघा व खुबे वेदना तपासणी मोफत करणार आहेत.
नवीन नांव नोंदणी करणाऱ्या रुग्णांची गुडघा व खुबे वेदना तपासणी मोफत होईल. फॉलोअप पेशन्टना नेहमीचे शुल्क असेल. नव्या – जुन्या अशा दोन्ही रुग्णांना एक्सरे तपासणीत ५० टक्के सवलत दिली जाईल. डॉ. सौरभ गिरी यांनी सांगितले की, पारंपरिक शास्त्रक्रियेपेक्षा रोबोटिक शस्त्रक्रिया रुग्णांसाठी अधिक फलदायी व सुखकारक आहे. रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये संभाव्य धोके टाळता येतात. संक्रमणाचा धोकाही कमी असतो. रक्तस्त्राव कमी होतो. या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण लवकर रिकव्हर होतो. त्यामुळे त्याचा रुग्णालयात ऍडमिट होण्याचा कालावधी कमी राहतो. विशेष म्हणजे रोबोटिक शस्त्रक्रियेनंतर काही तासात रुग्णाला चालता येते. त्यामुळे रोबोटिक शस्त्रक्रिया खुबा व गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आशेचा किरण ठरली आहे.
डॉ. सौरभ गिरी हे रुग्ण तपासणीसाठी ११ सप्टेंबर रोजी दुपारी तीन पासून सातारा डायग्नोस्टिक सेंटर, देवी कॉलनी, सदरबझार येथे उपलब्ध आहेत. ज्येष्ठ नागरिक व गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी ९१६८४३२४३२ या हेल्प लाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन सातारा डायग्नोस्टिक सेंटरने केले आहे.