खानदानी परंपरेतून घडलेला ‘रॉयल पिळदार मिशिवाला – श्री. महेश देशमुख (भाऊ)

कुडाळ(इम्तियाज मुजावर) सातारा जिल्ह्याच्या सहकार व बाजार समितीच्या क्षेत्रात, शेतकऱ्यांच्या हितासाठी, कर्मचारी वर्गाच्या उन्नतीसाठी आणि समाजकारणातील नेतृत्वासाठी जेव्हा एखादं नाव घेतलं जातं, तेव्हा त्या नावाच्या पुढे ठामपणे उभा राहतो बिभवी गावचा रॉयल माणूस – श्री. महेश संपतराव देशमुख (भाऊ).

मुळापासून कर्तृत्वाची वाटचाल

17 सप्टेंबर 1971 रोजी जन्मलेल्या महेशभाऊंच्या पाठीशी खानदानी परंपरेचा भक्कम वारसा आहे. त्यांचे वडील कै. संपतराव राजाराम देशमुख हे जावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन आणि बिभवी गावाचे माजी सरपंच होते. या घराण्याला स्व. छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या घराण्यावरील निस्सीम भक्ती आणि शिवेंद्रसिंहराजे, वेदांतिकाराजे भोसले यांच्याशी कौटुंबिक स्नेहाची परंपरा लाभली आहे.

सन 1994 मध्ये सातारा कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये लिपीक म्हणून कार्यारंभ करताना त्यांच्या कामातील निटनेटकेपणा, निर्णयक्षमता आणि मुत्सदिपणा लवकरच प्रकर्षाने दिसून आला. सभापती श्री. लालासाहेब पवार यांनी त्यांच्या नेतृत्वगुणांची दखल घेऊन त्यांची लेखापाल म्हणून नियुक्ती केली.

कर्मचारी व शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता

महेशभाऊंनी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा ओळखून सातारा जिल्हा बाजार समिती सेवक सहकारी पतसंस्था उभारली. 2001 पर्यंत ते संस्थेचे मानद सचिव म्हणून पूर्णपणे नि:स्वार्थीपणे काम पाहत राहिले.
त्याचबरोबर, स्व. छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या प्रेरणेने त्यांनी जरबेरा व अॅन्थुरियम या फुलांची ग्रीनहाऊस शेती केली. एवढंच नाही तर गावातील 18 शेतकऱ्यांना एकत्र आणून फुलशेतीसाठी प्रोत्साहित केले आणि रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय लिहिला.

गावविकासाच्या रणांगणातील नेतृत्व

महेशभाऊंच्या सामाजिक बांधिलकीचा परिपाक म्हणजे बिभवी विकास सेवा सोसायटी. गेले 15 वर्षे संचालक म्हणून कार्यरत राहून त्यांनी लोकांना एकत्र केले आणि मागील निवडणुकीत त्यांच्या पॅनेलने बहुमत मिळवून विजयी झेंडा फडकवला.
चेअरमन म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर केवळ तीन महिन्यात 60 लाखांचे कर्जवाटप करून लोकांच्या गरजा पूर्ण केल्या. बिभवी ग्रामपंचायतीने हाती घेतलेला “सोलर ग्राम” प्रकल्प साकार करण्यासाठी त्यांनी सहकाऱ्यांच्या बळावर आघाडी घेतली आहे.

राज्य पातळीवरील कर्तृत्व

सन 2001 पासून जावली कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर, ते महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाचे पुणे विभागीय सचिव आणि राज्य सचिव संघाचे कार्यकारिणी सदस्य आहेत. सातारा जिल्ह्यातील बाजार समिती सहकारी पतसंस्था मर्या सातारा यांचे चेअरमन म्हणूनही त्यांचे नेतृत्व भक्कमपणे उमटत आहे.

देशमुख भावकीचा विश्वास – एक घावात दोन तुकडे करणारे मार्गदर्शक

देशमुख घराण्याची ओळख म्हणजे खानदानी परंपरा आणि निश्चयाने उभं राहणारी साथ. सत्ता असो वा नसो, महेशभाऊ देशमुख आपल्या माणसांसाठी नेहमीच भक्कम आधार आहेत. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि धडाडीमुळे बिभवी गावच्या विकासाचा आराखडा वेगळा उभा राहिला आहे. स्पोर्ट्स क्रीडा खेळाची पहिल्यापासूनच आवड अगदी मॅरेथॉन स्पर्धेची धाव ते अगदी राजकारणापर्यंत शेवटच्या टोकापर्यंत धाव घेणारा महेश देशमुख असा एक धावपटू आहे की जो सहकारातला कोणतेही धावपट्टी सहजतेने पार करतो

आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महेशभाऊंना शुभेच्छा देताना असं म्हणणं योग्य ठरेल की –
ते फक्त चेअरमन नाहीत, तर एक रॉयल मार्गदर्शक, एक सामाजिक योद्धा आणि साताऱ्याच्या सहकार इतिहासातील ब्रँड सचिव म्हणून महेश देशमुख यांच्याकडे पाहिले जाते

💐💐💐💐
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – श्री. महेश देशमुख (भाऊ)!

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!