खंडाळ्या जवळील म्हावशी गावाजवळील पुलावरच पवनचक्कीचा ट्रेलर बंद पडल्याने लोणंद – खंडाळा मार्गावरील वाहतुक सुमारे दहा तास पेक्षा जास्त वेळ ठप्प (व्हिडीओ)

लोणंद ( प्रतिनिधी ) – लोणंद – खंडाळा रस्त्यावरील म्हावशी गावचे हद्दीतील पुलावर अहिरे येथील क्यु बेल्ट कंपनीतुन पवनचक्की घेऊन जाणारा ट्रेलर बंद पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक रात्री बारा पासुन सकाळ पर्यंत ठप्प झाली होती .पवनचक्कीचे टेलर वारंवार बंद पडत असल्यामुळे सकाळी कंपनीत कामाला जाणाऱ्या त्याचबरोबर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत . या रोडवर वाहनांच्या मोठया रांगा लागल्या होत्या .या रस्त्याला जवळचा कोणताही पर्याय मार्ग नसल्याने लांबून वळसा घालून वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे .


लोणंद – खंडाळा रस्त्यावरील म्हावशी
गावाजवळ असणाऱ्या पुलावर अहिरे येथील क्यु बेल्ट कंपनीतून पवनचक्की घेऊन जाणारा ट्रेलर शुक्रवारी रात्री 12 च्या सुमारास बंद पडला . एकामागे एक असे चार – पाच ट्रेलर त्यामुळे एकाच जागी उभे राहिले गेले . त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली . . त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती सकाळपर्यंत ही वाहतूक बंद होती .या मार्गावर पवनचक्कीचे टेलर वारंवार बंद पडत असतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते .
रात्रीपासून झालेली वाहतूक सकाळपर्यंत बंदच होती त्यामुळे सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी त्याच बरोबर कंपनीत जाणाऱ्या कामगार अधिकारी यांची मोठी अडचण झाली होती .म्हावशी गावाजवळून कोणताही दुसरा पर्याय मार्ग नसणारे नसल्याने अनेक वाहनांना वळसा मारून खंडाळा व लोणंद या ठिकाणी जावे लागत आहे . त्यामुळे वाहनचालक व ग्रामस्था मध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे .
यापूर्वी अशाच प्रकारचे पवनचक्कीचे टेलर लोणंद येथील लोणंद – शिरवळ रोडवर खेमावती नदीच्या पुलाजवळ पलटी होऊन तर अहिल्यादेवी चौकामध्ये पवनचक्की ट्रेलर बंद पडल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाल्याचे प्रकार घडले आहेत .या वाहनांची वाहतुक करताना योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिक व वाहनचालक करीत आहेत

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!