कोल्हापूर, अँटी करप्शन डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा कारचा अपघात… दोघांचा मृत्यू , तीनजन गंभीर जखमी…..

कोल्हापूर, अँटी करप्शन डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा कारचा अपघात… दोघांचा मृत्यू , तीनजन गंभीर जखमी…..

कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग तालुक्यातील तमटकल्लू गावाजवळ इनोव्हा ट्रकला धडकल्याने कारमधील दोघांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील अँटी करप्शन डीवायएसपी वैष्णवी पाटील या कार अपघातात प्रवास करत होत्या. यामध्ये त्यांची आई कमला (६५) आणि कार चालक राकेश (४०) यांचा मृत्यू झाला. डीवायएसपी वैष्णवी पाटील आणि इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर चित्रदुर्गातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आईसोबत तामिळनाडूला सहलीला गेलेल्या डीवायएसपी वैष्णवी कोल्हापूरला परतत असताना आज पहाटे अपघात झालायं . सीपीआय बालचंद्र नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली. ही घटना चित्रदुर्ग ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!