“कुडाळ सुपर प्रो लीग सीझन-२ उत्साहात संपन्न; कुडाळच्या क्रिकेटप्रेमींचा जल्लोष”

कुडाळ येथे आयोजित केलेल्या कुडाळ सुपर प्रो लीग (KSPL) सीझन-२ चा भव्य आणि उत्साहवर्धक समारोप मोठ्या जल्लोषात पार पडला. सर्व सामने अत्यंत अटीतटीचे झाले असून कुडाळच्या युवकांनी आपले सर्वोत्तम क्रिकेट कौशल्य सादर करून सर्व क्रिकेटप्रेमींची मने जिंकली.

या स्पर्धेत खेळाडूंनी दाखवलेला जोम, चुरस आणि संघभावना ही खरोखरच कौतुकास्पद होती. KSPL हे फक्त क्रिकेट स्पर्धा न राहता, एक सामाजिक एकात्मतेचे आणि ऊर्जा निर्माण करणारे व्यासपीठ ठरले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि मार्गदर्शनासाठी मा. वसंतरावजी मानकुमरे (भाऊ), मा. दत्ताशेठ भालेगरे साहेब, तालुका अध्यक्ष मा. संदीपजी परामणे, यात्रा कमिटीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सोसायटीचे संचालक व ग्रामस्थ यांचे मोलाचे योगदान लाभले. त्यांची उपस्थिती आणि सहकार्य यामुळे संपूर्ण स्पर्धेला अधिक भक्कम आधार मिळाला.

स्पर्धेच्या यशामागे सर्वात मोठी भूमिका निभावली ती स्पॉन्सर्स यांची, ज्यांनी आर्थिक पाठबळ व सहकार्याने स्पर्धा दिमाखात पार पाडली. सर्व स्पॉन्सर्सचे आयोजकांतर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

प्रत्येक संघाचे मालक व खेळाडू यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले, कारण त्यांनी खेळातील रंगत कायम ठेवत प्रेक्षकांना प्रत्येक सामन्याचा मनःपूर्वक आनंद घेण्याची संधी दिली. हार-जीत ही खेळाचा अविभाज्य भाग असली तरी खऱ्या अर्थाने या लीगमध्ये जिंकले ते “आपले कुडाळ”!
या आनंदी वातावरणात आयोजकांनी KSPL – सीझन ३ लवकरच आणण्याची अधिकृत घोषणा केली असून, क्रिकेटप्रेमींमध्ये यासाठी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.