कुडाळ सुपर-प्रो लिग पर्व दुसरे २०२५: जावली तालुक्यातील कुडाळ येथे ऐतिहासिक क्रिकेट आयोजन! प्रथमच खेळाडूंना मिळणार मानधन

कुडाळ सुपर-प्रो लिग पर्व दुसरे २०२५: जावली तालुक्यातील कुडाळ येथे ऐतिहासिक क्रिकेट आयोजन!

कुडाळ सुपर-प्रो लिग २०२५ (KSPL) मध्ये या वर्षी नवा इतिहास रचला जाणार आहे. कुडाळ पंचक्रोशीतील क्रिकेटच्या रसिकांसाठी एक अत्यंत आकर्षक आणि थरारक क्रिकेटची मजा लुटता येणार आहे २७-२८ एप्रिल २०२५ रोजी कुडाळ येथे रंगणार के एस पी एल चा क्रिकेटचा थरार या लिंक मध्ये क्रिकेट खेळणारा खेळाडूंसाठी म्हणजे कुडाळ मध्ये प्रथमच खेळाडूंचे AUCTION होणार आहे, जेणेकरून प्रत्येक खेळाडूला आयपीएल प्रमाणे मिळणार मानधन!
या अनोख्या क्रिकेट इव्हेंटला अत्यधिक महत्त्व देण्यात आले आहे, कारण प्रत्येक खेळाडूला त्याच्या कर्तुत्वानुसार आर्थिक पारितोषिक दिले जाईल. त्यामुळे आजपर्यंत अशा लीगमध्ये खेळाडूला कोणतेही मानधन मिळत नव्हते आता जावळी तालुक्यातील कुडाळ मध्ये लीग मध्ये ज्या टीम मध्ये खेळाडू खेळतील व ऑक्शन होईल त्या खेळाडूला प्रत्यक्ष टीम मालकाकडून मानधन देण्यात येणार आहे त्यामुळे खेळाडूच्या खऱ्या स्किल आणि मेहनतीला न्याय मिळणार आहे

क्रिकेट प्रेमी, युवक आणि खेळाडू यांच्यातील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या लिगमध्ये भाग घेण्यासाठी अनेक खेळाडू आणि क्रिकेटरसिक तयारीत आहेत. हा महोत्सव जावली तालुक्यातील कुडाळ मध्ये प्रत्येक क्रिकेट प्रेमीसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.

अशा या थरारक लिगमध्ये सहभागी होण्याची संधी गमावू नका! क्रिकेटच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी २७ आणि २८ एप्रिल रोजी कुडाळमध्ये भेट द्या आणि या महान इव्हेंटचा भाग व्हा.

आता मात्र, बॅट आणि बॉल सज्ज करा, गगनचुंबी षटकार चौकाराची बारिश पाहण्यासाठी कुडाळ सुपर-प्रो लिग २०२५ मध्ये तुफान धमाल होणार आहे!

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!