कुडाळ पंचायत समिती गणासाठी सौरभ शिंदेंना उमेदवारी; शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वावर मतदारांचा ठाम विश्वास

कुडाळ पंचायत समिती गणासाठी सौरभ शिंदेंना उमेदवारी; शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वावर मतदारांचा ठाम विश्वास

सातारा जिल्ह्यातील कुडाळ पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांना उमेदवारी देत राजकीय चक्र वेगाने फिरवलं आहे. सक्षम, तरुण आणि विकासाभिमुख नेतृत्वाची गरज लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला असून, कुडाळ गणाचा सर्वांगीण विकास साधू शकणारं नेतृत्व म्हणून सौरभ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार असताना विकासकामांना गती देण्यासाठी स्थानिक पातळीवर मजबूत आणि कार्यक्षम नेतृत्व असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हीच बाब लक्षात घेऊन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मनातलं नेतृत्व म्हणून सौरभ शिंदे यांच्यावर विश्वास टाकण्यात आला आहे. सहकार क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव, ऊस उत्पादक शेतकरी, कष्टकरी आणि गोरगरीबांच्या प्रश्नांची जाण, तसेच सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची क्षमता हे सौरभ शिंदे यांचं मोठं वैशिष्ट्य मानलं जात आहे.
उमेदवारी जाहीर होताच सौरभ शिंदे यांनी कुडाळ पंचायत समिती गणात प्रचारासाठी अक्षरशः पायाला भिंगरी लावली आहे. गावोगावी भेटी, मतदारांशी थेट संवाद, युवकांशी संवाद साधत त्यांनी प्रचारात वेग आणला आहे. या गणातील युवक मोठ्या संख्येने सौरभ शिंदे यांच्या पाठीशी उभे असून, त्यांच्या विजयासाठी जोमाने काम करत आहेत. शेकडो युवकांची स्वतंत्र प्रचार यंत्रणा सध्या कुडाळ गणात सक्रिय झाली आहे.


कुडाळ पंचायत समिती गणात एकूण ११ गावे असून सुमारे १४ हजार मतदार आहेत. या सर्व मतदारांचा विश्वास शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वावर आहे. जावळी–सातारा मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मिळालेलं विक्रमी मताधिक्य हेच त्यांच्या नेतृत्वावरचा विश्वास अधोरेखित करतं. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजेंनी दिलेला उमेदवार म्हणजेच सौरभ शिंदे यांना मत देणं, हे थेट शिवेंद्रसिंहराजेंनाच मत देणं मानलं जात आहे.
सोनगाव, सरताळे, सर्जापूर, बेलावडे, आरडे, कुडाळ, भिवडी यासह परिसरातील वाडी-वस्त्यांमध्ये सौरभ शिंदेंच्या विजयाची लाट निर्माण झाली आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ज्या क्षणी सौरभ शिंदेंची उमेदवारी जाहीर केली, त्याच क्षणी कुडाळ गणाचा विकास आणि विजय निश्चित झाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. सध्या सौरभ शिंदेंची घोडदौड सुरू असून, कुडाळ पंचायत समिती गणात ऐतिहासिक विजयाची नोंद होणार, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!