
कुडाळ पंचायत समिती गणामध्ये यंदाच्या निवडणुकीत राजकीय चित्र स्पष्टपणे बदलत असल्याचे दिसत आहे. प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे हे भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ गणासाठी ते एकमेव सक्षम, ताकदवान आणि विश्वासार्ह पर्याय ठरत आहेत, अशी भावना सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.
सौरभ शिंदे यांच्याकडे केवळ उमेदवारी नाही, तर अनुभव, प्रशासनावर असलेली पकड, सहकार क्षेत्रातील यशस्वी नेतृत्व आणि वरिष्ठ पातळीवरचा ठाम राजकीय शब्द ही सगळी भक्कम बाजू आहे. माजी पंचायत समिती सभापती म्हणून त्यांनी प्रशासन कसे चालते, निर्णय कसे घेतले जातात आणि निधी कसा खेचून आणला जातो, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे ते केवळ आश्वासन देणारे नव्हे, तर काम करून दाखवणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
प्रतापगड सहकारी साखर कारखाना अनेक वर्षे बंद अवस्थेत असताना तो पुन्हा सुरू करणे, हा अत्यंत कठीण आणि धाडसी निर्णय होता. मात्र चेअरमन म्हणून सौरभ शिंदे यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून जावळी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला. बंद कारखाना सुरू करणे म्हणजे केवळ उद्योग सुरू करणे नव्हे, तर हजारो शेतकरी कुटुंबांच्या अर्थकारणाला आधार देणे होय—आणि हे काम सौरभ शिंदे यांनी करून दाखवले.
काकाभय्यानंतर जावळी–कुडाळ पंचक्रोशीला जे सक्षम नेतृत्वाची उणीव भासत होती, ती उणीव सौरभ शिंदे यांच्या माध्यमातून भरून निघाली आहे, अशी भावना परिसरात बोलून दाखवली जात आहे. कुडाळ पंचायत समिती गण, कुडाळ जिल्हा परिषद गट आणि संपूर्ण पंचक्रोशीला शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली एक ठाम, धडाडीचे आणि विकास खेचून आणणारे नेतृत्व मिळाले आहे.
सौरभ शिंदे यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा राजकीय बॅकग्राऊंड, वरिष्ठ पातळीवरचा वलय आणि शब्दाची किंमत. त्यांचा शब्द कधीही खाली पडू दिला जात नाही. मंत्रालयात, राज्यस्तरावर आणि सहकार क्षेत्रात त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो. कोणत्याही विभागासाठी निधी आणायचा असेल, तर तो पाठपुराव्याने, दबावाने आणि विश्वासाने कसा आणायचा, हे सौरभ शिंदे यांना चांगले माहीत आहे.
आज राज्यात भाजपची सत्ता आहे, केंद्रातही भाजपची सत्ता आहे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले हे राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री असून राज्यात पाचव्या क्रमांकाचे महत्त्वाचे पद त्यांच्याकडे आहे. अशा परिस्थितीत, शिवेंद्रराजेंची विशेष मर्जी, विश्वास आणि प्रेम सौरभ शिंदे यांच्यावर असणे, हे कुडाळ गणासाठी सोन्याहून पिवळे आहे.
शिवेंद्रराजांच्या माध्यमातून आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी कुडाळ गणासाठी आणि गावासाठी आला आहे, आणि तो सौरभ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांतूनच. हे यश पाहता, भविष्यात यापेक्षाही अधिक निधी येऊ शकतो, हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. कारण सत्ता, संपर्क आणि सक्षम नेतृत्व—हे तिन्ही घटक एकत्र आले की विकास थांबत नाही, तो वेग घेतो.
म्हणूनच आज कुडाळ गणातील सामान्य जनता ठामपणे म्हणते की, “कुडाळ गावासाठी, गणासाठी आणि पंचक्रोशीसाठी यापेक्षा दर्जेदार नेतृत्व दुसरे नाही.” सौरभ शिंदे यांची निवड म्हणजे केवळ एक प्रतिनिधी निवडणे नव्हे, तर विकासाचा मार्ग खुला करणे आहे.
आज निर्णयाचा क्षण आहे. जर कुडाळ पंचायत समिती गणाला राज्य आणि केंद्र सरकारच्या सत्तेचा थेट फायदा घ्यायचा असेल, तर सौरभ शिंदे यांना प्रचंड बहुमताने निवडून देणे ही काळाची गरज आहे.
त्यांची निवड म्हणजे विकास, ताकद आणि विश्वासाची निवड आहे—आणि कुडाळच्या उज्ज्वल भविष्यासाठी हाच एकमेव सक्षम पर्याय आहे.



