“कुडाळच्या विकासकामावर दिशाभूल करणाऱ्यांना जनता ओळखते “कुडाळच्या रस्त्याच्या कामावर मिरवणाऱ्यांचा खोटारडेपणा उघड – जनता फसणार नाही!” धैर्यशील शिंदे

कुडाळ (प्रतिनिधी) – राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले हे मंत्री झाल्यापासून संपुर्ण तालुक्याचा गतिमान विकास सूरू असून जावली तालुक्यातील सर्वात मोठी लेकसंख्या असलेल्या कुडाळ गावातही कोट्यावधी रूपयांची विकासकामे सूरू झालेली आहेत, कुडाळ गावातील अंतर्गत मुख्य रस्ता संभाजी महाराज चौक – बाजारपेठ – हायस्कूल रस्ता- इंदीरानगर चौक हा रस्ता देखील खूप खराब झाल्याने आमचे नेते व प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सैारभबाबा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ ग्रामपंचायतीच्या वतीने नामदार शिवेंद्रराजे भोसले यांना सदरच्या रस्त्याच्या कामाबाबात पत्रव्यवहार करून निधीची मागणी करम्यात आली होती, सदरच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने जावक क्रमांक. मुअ,पुणे,नियो.धा.23.04.04/4788/2023 या संदर्भीय पत्रानुसार 2023 सालामध्येच मंजूरी देण्यात आलेली होती, त्यामुळे मात्र काही तांत्रिक अडचणी व निधी अभावी सदरच्या रस्त्याचे काम थांबले होते, त्यानंतर नामदार बाबाराजेंच्याकडे बांधकाम खात्याचे मंत्रीपद आल्यानंतर तात्काळ या कामांना निधी उपलब्ध झाला असल्याने या रस्तायाच्या कामाला आता सुरूवात होत आहे, मात्र आज ज्यांचा या कामाशी दूरपर्यंत कसलाही संबंध नाही त्यांनी सदरचे कामाबद्दल फोटोसेशन करून केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र अशा दिशाभूलीला सुज्ञ जनता भुलणार नसल्याचे मत कुडाळच्या सरपंच सैा.सुरेखा कुंभार यांनी प्रसि्धदीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.


ये पब्लिक है…ये सब जानती है- धैर्यशिल शिंदे
आमचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून व मा.सैारभबाबा शिंदे यांच्या सहकार्याने कुडाळ ग्रामपंचायतीने पाठपुरावा केलेल्या कुडाळ येथील रस्ताच्या कामाला सुरूवात होत असल्याने नामदार भोसले यांचे कुडाळ ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने अभिनंदन करतो, मात्र सदरचे काम मुळात 2023 सालीच मंजूर झालेले आहे, सदरच्या मंजूरीचे पत्रदेखील ग्रामपंचायतीकडे आहे, याकामासाठी वास्तविक सौरभ बाबा शिंदे , मालोजीराव आण्णा शिंदे , राजेंद्रजी शिंदे , जितेंद्रदादा शिंदे, यांच्यासह सरपंच व सर्व सदस्य यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता, त्याला आज यश आले आहे, मात्र ज्या लोकांनी आदरणीय बाबाराजेंच्या विधानसभा निवडणुकीत विरोधी भुमिका बजावली ती मंडळी बाबाराजेंनी मंजुर करून दिलेल्या कामावर फोटो सेशन करतायत व माप पट्टी घेऊन ऊभे राहतायत.
ज्यांनी बाजारपेठेत उभे राहुन एकेरी उल्लेख केले ती आज फोटो काढतायत व कामात आमचा वाटा असल्याचा केविलवाणा आव आणतायत. मात्र ये पब्लिक है…ये सब जानती है… त्यामुळे
अशा दिशाभुलीला सुज्ञ जनता कधीही थारा देणार नाही, हे काम मंजुर होऊन एक वर्ष हुन ही अधिक काळ गेलेला आहे. परंतु तांत्रिक अडचणी व पैसे ची उपलब्धता नसल्याने कामाला थोडी दिरंगाई झाली . महाराज साहेबांनी पैसे उपलब्ध करून दिल्याने आता कामाला प्रत्यक्षात सुरवात होत आहे.
त्याबद्दल महाराज साहेबांचे मनःपूर्वक आभार.
ज्यांचा काहीही संबंध नाही ती कितीही नाचली आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी उपयोग होणार नाही. आणि विधानसभेला बाबाराजेंच्या विरोधात मते मागणार्यांना बरोबर घेऊन विकास कामांवर मिरवणार्यांनी आत्मपरीक्षण करावे.
आज कुडाळ व पंचक्रोशी चे सर्व रस्त्यांची कामे महाराज साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पथावर आहेत. व आमचे नेते यांच्या कामावर यायची व आमच्या नेत्यांनी केलेला विकास काम मान्य करायची नामुष्की ह्या अशा लोकांवर येत आहे हे ही समाधानकारक बाब आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!