कुडाळचा बहुमान… जावळीचा अभिमान!संदेश कांबळेची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी थेट निवड

सातारा :
कुडाळ (ता. जावळी) येथील सुपुत्र संदेश उमेश कांबळे याने सातारा जिल्हा ज्युनिअर मैदानी स्पर्धेत फास्टरलाईफ ॲथलेटिक्स क्लब तर्फे १६ वर्षाखालील वयोगटात ६०० मीटर धावण्याच्या प्रकारात चमकदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी थेट निवड झाली असून, जावळी तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.

गावात धावपटूंसाठी मैदान नाही, ॲथलेटिक्सचा प्रशिक्षक नाही, तरीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत संदेशने मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हा मानाचा टप्पा गाठला. त्याच्या यशामध्ये क्लब कोच सोनल शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, जावळी भाजप तालुकाध्यक्ष संदीप परामने, राष्ट्रीय 100 मीटर धावपटू इम्तियाज मुजावर सिनियर कराटे कोच अविनाश गोंधळी सचिन मदने आणि क्रीडाप्रेमी यांनी संदेशचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

मेहनत आणि जिद्दीच्या बळावर राज्यस्तरावर पोहोचलेला हा तरुण धावपटू आज कुडाळचा बहुमान आणि जावळीचा अभिमान ठरत आहे.


aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!