कास पठार वर पर्यटकांसाठी दर्जेदार वननिवास; सातारा वनविभागाचा आदर्श उपक्रम:कास पठार वन निवासामुळे पर्यटकांची सोय : अमोल सातपुते

कास पठार वन निवासामुळे पर्यटकांची सोय : अमोल सातपुते
सातारा :इम्तियाज मुजावर
सातारा जिल्‍हा हा पर्यटन जिल्‍हा म्‍हणून नावारुपाला येत आहे. दरवर्षी हजारो पर्यटक जिल्‍ह्यातील विविध ठिकाणांना भेट देत असतात. कास पठार पुष्‍पहंगामाला देखील देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्‍येने हजेरी लावत असतात. तसेच वरिष्‍ठ अधिकाऱ्यांचे दौरेदेखील होतात, त्‍यांच्‍या निवासाची सोय करण्‍यासाठी वनविभागाने कास पठार वननिवास उभारुन मोठी सोय केली आहे, असे प्रतिपादन उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी केले.


सातारा वनविभाग मुख्‍यालयाच्‍या आवारात कास पठार वननिवास उभारण्‍यात आले आहे. वनविभागाच्‍यावतीने या इमारतीचे नूतनीकरण करण्‍यात आले. या इमारतीच्‍या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सहायक वनसंरक्षक (वनीकरण) प्रदीप रौंधळ, सहायक वनसंरक्षक (रोहयो व वन्‍यजीव) दिगंबर जाधव सहायक वनसंरक्षक (वनीकरण व कॅम्‍पा) जयश्री जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे, वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्‍थित होते.
वनविभागाच्‍या जागेत असलेल्‍या जुन्‍या इमारतीचे नूतनीकरण करुन दोन सूट तयार करण्‍यात आले आहेत.

एकाला अजिंक्‍यतारा व दुसऱ्याला सज्‍जनगड असे नामकरण करण्‍यात आले आहे. यासोबतच वनपाल निवासाचेही उदघाटन करण्‍यात आले. या दोन्‍ही इमारतींमध्‍ये सौरऊर्जेची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. या कामामध्‍ये सहायक वनसंरक्षक प्रदीप रौंधळ आणि वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे यांनी परिश्रम घेतले. दरम्‍यान, यावेळी परिसरामध्‍ये वृक्षलागवड देखील करण्‍यात आली.


२६एसएटी२८
सातारा : कास पठार वननिवासाच्‍या उदघाटनप्रसंगी उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक प्रदीप रौंधळ, दिगंबर जाधव, जयश्री जाधव, संदीप जोपळे, गणेश महांगडे सोबत अधिकारी व कर्मचारी.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!