कडक उन्हाळ्यातही महाबळेश्वरात अंगाला झोंबतोय गार गार वारा दुपारनंतर कोसळता मुसळधार पावसाच्या धारा
सातारा : महाबळेश्वरमध्ये पर्यटकांचा मुख्य हंगाम सुरू झाला असून ऐन उन्हाळ्यात येथे सलग दहा दिवसापासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने ‘पर्यटक राजा’ चांगलाच सुखावला आहे. पावसामुळे महाबळेश्वरच्या रुपडे पालटले आहे निसर्गाची मनमुराद उधळण महाबळेश्वर पाचगणी मध्ये पहावयास मिळत आहे संध्याकाळी सनसेट होत असताना आकाशामध्ये असणारी गुलाबी लाली पश्चिम दिशेने आकाशाकडे निर्माण होणारी भगवी छटा आणि त्यात सुप्रसिद्ध असणारे वेण्णा लेक या तलावात थंडगार हवेत होणारे नौका विहार पर्यटकांना मनमुराद आनंद देऊन जात आहे
उष्णतेच्या या वातावरणात महाबळेश्वरचा थंडावा पर्यटकांना रोज नवा अनुभव देऊन जात आहे त्यामुळे डोंगर पायथ्यावरून महाबळेश्वरच्या उंच पठारावर आलेल्या प्रत्येक पर्यटक महाबळेश्वरच्या गुलाबी थंडीची मजा लुटत आहे
उन्हाळी हंगामात वातावरणात झालेल्या या बदलामुळे महाबळेश्वर पर्यटकांनी बहरून गेले असून मागील १५ दिवसांत सुमारे १० लाख पर्यटकांनी या पर्यटनस्थळाला भेट दिली आहे.
महाबळेश्वर पाचगणी हे पर्यटकांच्या पसंतीसाठी नेहमीच अग्रस्थानी असते. दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात; परंतु पर्यटकांचा मुख्य हंगाम हा एप्रिल आणि मे महिना असतो. कडक उन्हाळ्यात महाबळेश्वरात पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने . एप्रिल मे महिन्यात किती तरी वेळा असे वातावरण पाहावयास मिळाले आहे. अशातच सलग दहा दिवसां पासून झालेल्या वळवाच्या पावसामुळे वातावरणात बदल घडला आहे. संपूर्ण महाबळेश्वर परिसरातील पर्वतरांगा या दहा दिवसात हिरव्यागार झाल्या आहेत तर काही पठार देखील हिरवीगार झाली आहेत
काही हौशी पर्यटकांबरोबरच स्थानिक नागरिकांनीही गेल्या दहा दिवसापासून या पावसाचा आनंद लुटला. पर्यटकांचा उन्हाळी हंगाम सुरू झाल्याने येथील हॉटेल व्यावसायिक तसेच मुख्य बाजारपेठ पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. व सर्व हॉटेल्स रिसॉर्ट बंगले हाऊसफुल झाले आहेत महाबळेश्वरची खासियत असणा-या स्ट्रॉबेरीपासून ते जाम, जेली, चिक्की, चने अशा वस्तूंनी बाजारपेठ बहरून गेली आहे. पर्यटक दिवसभर येथील विविध ठिकाणी भेट देत आहेत. तर सायंकाळी नौकाविहारासाठी पर्यटकांची वेण्णा तलाव येथे गर्दी होत आहे. महाबळेश्वरसोबतच पाचगणीलाही पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असल्याचे चित्र आहे. एप्रिल आणि मे या महिन्यांत येथे पर्यटकांची संख्या सर्वाधिक असते. महाबळेश्वरला भेट देणा-या पर्यटकांमध्ये गुजराती पर्यटकांची संख्या अधिक आहे. या व्यतिरिक्त कर्नाटक, तमिळनाडू, पंजाब या राज्यांतूनही पर्यटक दाखल झाले आहेत