औषध निर्मात्यांचे योगदान मानवी आरोग्यासाठी ठरले वरदान – संशोधक ङाॅ.धीरज शिंदे
गौरीशंकर बी फार्मसी लिंब मध्ये जागतिक औषधनिर्मीता दिन उत्साहात साजरा
लिंब – औषधनिर्माण कंपन्यांनी सातत्याने नाविन्यपूर्ण संशोधनातून निर्माण केलेली औषधे मानवी जीवनाचे आयुष्यमान उंचावण्यासाठी उपयुक्त ठरली आहेत त्याचे हे योगदान मानवी आरोग्यासाठी एक वरदान लाभले आहे असे मत संशोधक डॉ. धीरज शिंदे यांनी व्यक्त केले ते लिंब ता. जि. सातारा येथील गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयात 25 सप्टेंबर जागतिक औषधनिर्मिती दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते .
यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्य डॉ. अजित कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. योगेश गुरव ,डॉ. संतोष बेल्हेकर, डॉ. धैर्यशील घाडगे ,डॉ.भूषण पवार,ङाॅ.स्फूर्ती साखरे, प्रा. माधुरी मोहीते, प्रबंधक निलेश पाटील अदि प्रमुख उपस्थित होते .
डॉ. धीरज शिंदे म्हणाले की काळानुसार मानवी जीवनाच्या बदलत्या जीवनशैलीचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होत असून सततची धावपळ ताणतणाव संतुलित आहाराच्या अभाव परिणाम आरोग्यावर होत असून त्यामुळे विविध आजारास निमंत्रण मिळत आहे.
जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर म्हणाले की औषध निर्माण क्षेत्र काळानुसार खूप प्रगत व प्रगल्भ झाल्याने मानवी जीवन सुखकर झाले आहे.
प्राचार्य डॉ. अजित कुलकर्णी म्हणाले की दुर्धर आजारावर प्रभावी व परिणामकारक औषध निर्मितीसाठी औषध निर्माण कंपन्या सातत्याने नवे नवे संशोधन करीत असतात त्याच्या या प्रयत्नामुळेच रुग्णांना आजारावर मात करता येते .
प्रारंभी जागतिक औषधनिर्मिती दिनानिमित्त दिपप्रज्वलन संशोधक डॉ. धीरज शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.गौरी इथापे व आभार ङाॅ सतोष बेल्हेकर यानी केले
चौकट – मागील 25 वर्षात औषधनिर्माण शास्त्रात मोठी क्रांती झाली आहे. मानवी शरीरात उदभविणार्या विविध आजारावर नवे संशोधन होवून त्यावर प्रभावी व परिणामकारक औषध निर्मिती घडवण्यात औषधनिर्मात्याना यश आले आहे. त्यामुळे अनेक दुर्धर आजार आता सहज बरे होत आहेत. अर्थात यासाठी औषधनिर्मात्यांनी घेतलेले परिश्रम लाख मोलाचे ठरले आहे.
विशेषता कोरोनासारख्या महामारी संकटाचा मुकाबला करण्यासाठी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने केलेल्या संशोधनामुळे साऱ्या विश्वातील मानवी जीवन सुरक्षित राहिले आहे.
फोटो – जागतिक औषधनिर्माता दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ धीरज शिंदे समवेत श्रीरंग काटेकर ,डॉ. अजित कुलकर्णी डॉ. योगेश गुरव