
माऊलीच्या पावलांशी पाऊल मिळवणारी ‘माऊली’ – अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांचं अनुकरणीय योगदान!
सातारा, प्रतिनिधी: इम्तियाज मुजावर
वारी म्हणजे भक्ती, शिस्त आणि व्यवस्थापन यांचं अद्भुत संमेलन. आणि यंदाच्या वारीत, सातारा जिल्ह्यात दाखल झाल्यावर माऊलींच्या पालखीचे स्वागत जितक्या भक्तिभावाने झालं, तितक्याच कणखर पण मायाळू व्यवस्थापनाने डॉ. वैशाली कडूकर मॅडम यांनी पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून पार पाडलं.
गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवताना, वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, विशेषतः माता-भगिनींना सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा मिळावी, यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांना सूचनांचं पालन काटेकोरपणे करण्यास सांगितलं गेलं.
डॉ. वैशाली कडूकर यांचं नेतृत्व केवळ प्रशासकीय नाही, तर ते भावनिक आणि सामाजिक बांधिलकीचं जिवंत उदाहरण आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यात त्यांचा वारकऱ्यांमधील सहभाग ‘एक अधिकारी म्हणून’ नाही, तर ‘एक सेवक आणि माऊलीचं रूप’ म्हणून पाहायला मिळाला.
👮♀️ महिलांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था:
गेल्या दीड वर्षात डॉ. कडूकर मॅडम यांच्या मार्गदर्शनात सातारा जिल्ह्यात महिला पोलीस अधिकारी आणि पोलीस सेवांमधून महिलांना न्याय मिळवून देण्याचं काम प्रभावीपणे झालं आहे. त्यांच्या निर्णयक्षमतेमुळे अनेक गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली आणि महिलांच्या मनात पोलिस दलाबद्दल विश्वास निर्माण झाला.
📸 एक फोटो… हजार शब्दांपेक्षा जास्त बोलणारा!
वारी दरम्यान डॉ. कडूकर मॅडम यांचा माऊलींमधील हरवलेला, शांत, भक्तिपूर्ण चेहरा कॅमेऱ्यात टिपला गेला – आणि तो फोटो सध्या सोशल मीडियावर ‘माऊलीच्या रूपातील अधिकारी’ म्हणून प्रसिद्ध होतो आहे.

💬 साताऱ्याच्या मातृशक्तीचा अभिमान!
साताऱ्यातल्या महिलांसाठी, पोलीस दलातील सहकाऱ्यांसाठी आणि वारीत सहभागी लाखो वारकऱ्यांसाठी, डॉ. वैशाली कडूकर यांचं हे योगदान प्रेरणा देणारं आहे.
त्यांचा हा सेवाभाव सांगतो – “पद मोठं असलं, तरी सेवा हवी ती माणुसकीची!”
.