आपली फलटण मॅरेथॉनमध्ये लोणंदच्या भैरवनाथ डोंगर ग्रुपने झाडे लावा झाडे जगवाचा संदेश

आपली फलटण मॅरेथॉनमध्ये लोणंदच्या भैरवनाथ डोंगर ग्रुपने झाडे लावा झाडे जगवाचा संदेश

लोणंद – आपली फलटण मॅरेथॉन 2023 मध्ये लोणंदच्या श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या सुमारे 50 पेक्षा जास्त सदस्यांनी सहभागी होत झाडे लावा झाडे जगवा असा पर्यावरण संतुलित राखण्यासाठीचा संदेश दिला .
आज रविवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी जोशी हॉस्पिटल फलटण यांच्यावतीने आयोजित केलेल्या आपली फलटण मॅरेथॉन 2023 मध्ये लोणंदच्या श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपने ग्रुपच्या सुमारे 50 पेक्षा जास्त सदस्यांनी सहभाग घेतला .
या मॅरेथॉन मध्ये दहा किलोमीटर पाच किलोमीटर व तीन किलोमीटर अशी मॅरेथॉन सर्वच सदस्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली .त्यामध्ये 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेले व चिमुकली कु राजमुद्रा भोसले यांचाही समावेश होता .


लोणंदच्या भैरवनाथ डोंगरावर झाडे लावून ती जगण्याचे काम करणाऱ्या व पर्यावरणाचा संतुलन राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या सदस्यांनी मॅरेथॉन मध्ये सहभागी होताना आपले आरोग्य चांगले राहिले पाहिजे हा विचार ठेवला होता .
त्याचबरोबर पर्यावरणाचे ही संतुलन राहिले पाहिजे यासाठी भैरवनाथ डोंगर ग्रुपने मॅरेथॉन मध्ये झाडे लावा झाडे जगवा असा घोषणा देत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला .
भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या या उपक्रमाचे फलटण मॅरेथॉनचे प्रमुख डॉ. प्रसाद जोशी यांच्याबरोबर मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी कौतुक केले .
या मॅरेथॉनमध्ये डोंगर ग्रुपच्या सदस्यांनी झुम्बा डान्स करीत नाचण्याचा आनंद घेतला .

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!