नुकतेच पुणे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कुस्तीगीर परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली.
त्यामध्ये राज्यातील एकूण 45 जिल्हा संघ राज्य कुस्तीगीर परिषदेला संलग्न असल्यामुळे त्यांनी सर्वानुमते “जंतरमंतर” दिल्ली येथे बसलेल्या कुस्तीगीर यांना न्याय मिळावा असा ठराव पारित करण्यात आला, व ब्रिजभूषण यांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. सदर सभेला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून दोन प्रतिनिधी जातात आणि त्यांच्या माध्यमातून जो निर्णय कुस्तीगीर परिषदेचा होतो तोच निर्णय राज्यातील सर्व जिल्हा तालीम संघांना लागू असतो. म्हणून केलेला जो ठराव तो आज फक्त जिल्ह्याचा नसून तो संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने झालेला आहे अशी माहिती सातारा जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार (भाऊ) यांनी दिली