कराड दक्षिणचे आमदार अतुल बाबा भोसले यांच्या विशेष सहकार्यातून कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथे आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे.
👉 भाजप शक्ती केंद्रप्रमुख हेमंत काका धर्मे यांच्या पुढाकारातून आणि आमदार अतुल भोसले यांच्या पाठबळावर ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पन्नास टक्के सवलतीत स्मार्ट एलईडी टीव्ही, रेंजर सायकल, आटा चक्की आणि वॉशिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
📍 या योजनेचा लाभ घेण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी रेठरे बुद्रुक येथे विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
🔹 कराड डेपो साठी सहा बसेस मिळवून देणे असो किंवा जागेवर न्यायनिवाडा करून देणे असो – अशा विविध योजनांमुळे आमदार अतुल भोसले कायम चर्चेत असतात. आणि आता या नव्या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्येही हेमंत धर्मे यांचे नाव विशेष चर्चेत आले आहे.
हेमंत पाटील
AIM Media साठी – सातारा, कराड