अंश हाबळे देशात १४व्या क्रमांकाने राष्ट्रीय मिलिटरी स्कूल प्रवेश परीक्षेत बाजी मारली

अंश हाबळे देशात १४व्या क्रमांकाने राष्ट्रीय मिलिटरी स्कूल प्रवेश परीक्षेत बाजी मारली

पाचगणी प्रतिनिधी

भारतातील नामांकित पाच मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दि. ८ डिसेंबर २०१४ रोजी घेतलेल्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूल प्रवेश परीक्षेचा निकाल दि. २८ जानेवारी २०२५ रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत जावळी तालुक्यातील आखाडे येथील मेरी एंजल्स इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स, आखाडे येथील विद्यार्थी कॅडेट अंश गणेश हाबळे याने सिव्हिलियन जनरल कॅटेगरीत १४वा क्रमांक प्राप्त करून एक मोठा यशस्वी विक्रम रचला आहे.

अंश हाबळेने या लेखी परीक्षेत १५० पैकी १३० गुण मिळवले, आणि त्याच्या यशाला आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, जावळी शाखेच्या मार्गदर्शनाचे महत्त्व आहे. संस्थापक श्री. नवनाय देशमुख सर, सौ. स्वाती शिंदे मॅडम आणि श्री प्रेमराज शिंदे सर यांच्या मार्गदर्शनामुळे त्याला हे यश प्राप्त झाले.

अंशच्या या यशाचे अभिनंदन मेरी एंजल्स इंग्लिश मिडियम स्कूलच्या संस्थापिका श्रीमती क्रांती पवार, अँड. करण पवार सर, केशव पवार सर आणि इतर शिक्षक वर्गाने केले. अंशला आता हिमाचल प्रदेशातील चैल येथे पुढील मुलाखतीसाठी निवड करण्यात आली आहे.

अंश हाबळेचा हा यशस्वी मार्ग विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरला असून त्याच्या कष्टाची आणि समर्पणाची ही कमाई समाजासाठी एक प्रेरणा आहे.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!