कोमल कांबळे प्रकरण: हल्लेखोरांना तात्काळ अटक करा –आझाद समाज पक्ष जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सपकाळ यांची मागणी

:


कोमल कांबळे प्रकरण: हल्लेखोरांना तात्काळ अटक करा – जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सपकाळ यांची मागणी

सातारा, ३० एप्रिल २०२५ – वाई येथे कोमल कांबळे यांच्यावर झालेल्या गंभीर हल्ल्याप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच पीडितेला सुरक्षा पुरवावी, अशी मागणी आजाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सपकाळ यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक सातारा यांना देण्यात आले.

कोमल कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ३ एप्रिल २०२५ रोजी माधवी गणेश भोसले आणि बापू रामचंद्र भोसले यांनी त्यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केली, मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात वाई पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-अजमात अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रोसिटी) आणि इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, जो न्यायालयाने मंजूर केला.

मात्र, जामीन मिळाल्यानंतर २२ एप्रिल रोजी गणेश भोसले आणि बापू भोसले यांनी पुन्हा एकदा कोमल कांबळे यांना नंदनवन सोसायटीमध्ये जाऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर लगेचच २३ एप्रिल रोजी कोमल कांबळे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. हा हल्ला याच आरोपींच्या संगनमताने झाला असल्याचा आरोप कोमल कांबळे आणि आजाद समाज पक्षाने केला आहे.

जखमी कोमल कांबळे यांनी सातारा विश्रामगृह येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलिस प्रशासनाकडून होत असलेला अन्याय उघड केला. त्यांनी पोलिसांवर आरोपींना पाठीशी घालण्याचा आरोप केला आणि स्वतःच्या जीवाला धोका असल्याचेही सांगितले.

या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सपकाळ यांनी बापू भोसले यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर करण्यात यावा, तसेच हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच कोमल कांबळे यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदन देताना जगदीश कांबळे, विजय सपकाळ, नंदकिशोर कांबळे, अल्केश सोनवणे, संतोष कांबळे यांच्यासह आजाद समाज पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

aimmedia

वाचक संख्या  

बातमी शेयर करा.

error: Content is protected !!